Ajay Kandewar,Wani:- शहरातील विराणी फंक्शन हॉल जवळ एका सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर वणी पोलिसांनी कारवाई करीत अंदाजे किं.1 लाख रु.वर मुद्देमाल जप्त केला. यात रोहित सुभाष तारुणा रा.वणी या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले.18 फेब्रुवारी रोजी सकाळचा सुमारास ही कारवाई करण्यात आली.
विराणी फंक्शन हॉल जवळ एका किराणा येथून महाराष्ट्रात बंदी असलेला सुगंधित तंबाखूची विक्री सुरू असल्याची माहिती वणी पोलिसांना मिळाली. माहितीवरून SDPO गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली वणी ठाणेदार P.I उंबरकर यांनी सदर ठिकाणी सापळा रचला. पहाटे तब्बल दोन तासानंतर आरोपी रोहित सुभाष तारूण रा. वणी हा प्रतिबंधित तंबाखूसहित आढळून आला. याच वेळी पोलिसांनी त्याच्या झडती घेतली. त्यात 48 किलोचा प्रतिबंधित तंबाखू अंदाजे किं.1 लाख रु.वर मुद्देमाल जप्त केला.या ठिकाणी मजा कंपनीचे काहीं डब्बे व सुगंधित तंबाखूचें पॉकिटे आढळून आलें. मात्र आरोपीला खुप उशीरा पकडण्यात आलें अशीही बोंब आहे तरीही वणी पोलीसानी अटक केलीच.पोलिसांनी सदर तंबाखू जप्त केला व अन्न सुरक्षा अधिकारी अन्न सुरक्षा मानके अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात येणार येत आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
सदर कारवाई पोलिस अधिक्षक कुमार चिंता,अप्पर जिल्हा अधिक्षक पियूष जगताप यांच्या आदेशाने वणी SDPO गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात वणी ठाणेदार P.I.गोपाल उंबरकर यांनी टीमसहित केली.