•नवनियुक्त अध्यक्ष लायन राजाभाऊ पाथ्रडकर व सचिव लायन किशन चौधरी
अजय कंडेवार,वणी:- लायन्स क्लब वणीचे नवनिर्वाचित अध्यक्ष लायन हरिहर उर्फ राजाभाऊ पाथ्रडकर व त्यांचे सहकारी यांचा पदग्रहण सोहळा (२०२३-२४) लायन भरत भलगट (Vice Dist. Governor-II) यांच्या हस्ते येथील लायन्स इंग्लिश मिडीयम स्कुलच्या सभागृहात घाटात संपन्न झाला.Inauguration ceremony of Lions Club completed…..!
या वेळी प्रमुख अतिथी म्हणून वणी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार लायन संजीवरेड्डी बोदकुरवार, लायन राजकुमार झाडे (Region Chairperson, Region-VIL), लायन विकास घाटे (Zone Chairperson, Zone-1) लायन्स क्लबच्या मावळत्या अध्यक्षा लायन मंजीरी दामले व सचिव लायन सुनिता खुगर तसेच नवनियुक्त अध्यक्ष लायन हरिहर पाथ्रडकर व सचिव लायन किशन चौधरी मंचावर उपस्थित होते.
लायन भरत भलगट यांनी नवनियुक्त अध्यक्ष लायन हरिहर पाथ्रडकर, सचिव लायन किशन चौधरी, व त्यांचे नवनियुक्त सहकारी लायन शांतीलील पांडे (उपाध्यक्ष), लायन दुरदाना अहेमद (उपाध्यक्ष), लायन किशन चौधरी (सचिव), लायन चंद्रकांत जोबनपुत्रा (कोषाध्यक्ष), लायन नरेंद्र बरडीया (Membership Chairperson), लायन प्रमोद देशमुख (Club LCIF Co-ordinator), लायन पुरुषोत्तम खोब्रागडे (Director), लायन सुधीर दामले (Director), लायन बलदेव सुंगर (Director) यांना लायन्स क्लब वणीचे डायरेक्टर म्हणून त्यांच्या जबाबदान्या समजावुन सांगितल्या तसेच नविन सदस्य लायन विणा खोब्रागडे, लायन तुषार नगरवाला, लायन खुशी नगरवाला यांना सदस्यत्वाची शपथ दिली.
यावेळी लायन भरत भलगट, आमदार लायन संजीवरेड्डी बोदकुरवार, लायन राजकुमार झाडे, लायन विकास घाटे या मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून नवनियुक्त पदाधिकान्याचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. दिपप्रज्वलनानंतर लायन मंजोरी दामले यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त करून क्लबच्या मागील कार्याचा आढावा घेतला. तसेच नवनियुक्त अध्यक्ष लायन हरिहर पाथ्रडकर यांनी स्विकृतपर मनोगत व्यक्त करून सर्वांच्या सहकार्याने सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक उपक्रम राबविण्याचा मनोदय व्यक्त केला.
या कार्यक्रमास पत्रकार, प्रतिष्ठित नागरीक, लायन्स इग्लिस मिडीयम हायस्कुल, ज्युनियर व सीनीयर कॉलेजचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षिका वृद उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन चित्रा देशपांडे व सोनाली काळे यानी केले व आभार लायन किशन चौधरी यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.