Saturday, June 6, 2026
Homeवणीरेल्वे बोगद्यात दुचाकीला बसची जबर धडक.....

रेल्वे बोगद्यात दुचाकीला बसची जबर धडक…..

•दुचाकीस्वार जागीच ठार

देव येवले, (झरी तालुका प्रतिनिधी):- पाटन बोरी मार्गावरील अहेरअल्ली गावाजवळील रेल्वे बोगद्यात सकाळी 9 वाजताच्या दरम्यान बस व दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात धानोरा येथील रामदास तुडमवार वय 50 या इसमाचा अपघातात घटनास्थळी दुर्दैवी मृत्यू झाला.

प्राप्त माहिती नुसार धानोरा येथील रामदास तुडमवार हे काही कामानिमित्त आपल्या दुचाकीने आदिलाबाद येथे जात असताना समोरून येणाऱ्या बस क्र. MH-40 AD 6062 ने पाटन बोरी मार्गावरील अहेरअल्ली गावाजवळील रेल्वे बोगद्यात दुचाकीला जबर धडक दिली. या बसच्या धडकेत रामदास तुडुमवार हे खाली पडले.

त्यात डोक्याला जबर मार लागल्याने जागीच प्राणगत झाले. मृत्युदेहाचे शवविच्छेदन करण्याकरिता झरी येथील ग्रामीण रुग्नाणालयात पाठविले असून तपासणी नंतर शव नातेवाईक यांच्या स्वाधीन देण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page