•चोरट्यांची रात्री रेकी सुरू… महसूल गप्प?
अजय कंडेवार,वणी:- कायर परिसरात दिवस-रात्र बेकायदा रेती उपसा व रेतीची चोरटी वाहतूक होत असून त्याकडे महसूल अधिकाऱ्यांचे ‘दुर्लक्ष’ होत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. त्यानंतर रेती माफियांना मोकळे रान कोण करुन देत आहे. अशी स्थिती चर्चा नागरिकांत आहे. सर्रासपणे रात्री रेतीची चोरटी ट्रॅक्टरने सूरु वाहतूक आहे. पारंपरिक पद्धतीने रेती काढणाऱ्यांनाही सायंकाळनंतर रेती वाले चोरटे मस्त लोकेशन घेऊन बसतात व रात्री रेतीचा ट्रॅक्टर ची वाहतूक करत असते असे जनतेकडून बोलल्या जात आहे.. याकडे महसूल दुर्लक्ष का ?