•आदिवासी जनजागृती युवा संघटना व वीरांगना राणी दुर्गावती महिला संघटना राजूर यांचे संयुक्त विद्यमाने.
अजय कंडेवार,वणी :- महामानव क्रांतीसूर्य धरती आबा बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त राजूर कॉलरी येथे ता.15 नोव्हें.आदिवासी जनजागृती युवा संघटना व वीरांगना राणी दुर्गावती महिला संघटना राजूर यांचे संयुक्त विद्यमाने भव्य अभिवादन रॅली चे आयोजन करण्यात आले होते.
रॅलीत बहुसंख्य आदिवासी समाज बांधव तसेच राजूर गावातील व परिसरातील अनेक लोक उपस्थित होते. विशेष म्हणजे या रॅली मध्ये संघटनेद्वारा सामाजिक विचार म्हणून रॅलीत बिरसा मुंडा सह छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र रॅलीत फिरविण्यात आले. रॅलीचे गावात ठिकठिकाणी भव्य स्वागतही करण्यात आले ज्यामुळे गावातील वातावरण प्रसन्न झाले होते व आदिवासी समाजाबरोबर संपूर्ण गावकर्यांनी महामानव बिरसा मुंडा जयंती जल्लोषात साजरी केली.
या रॅलीला यशस्वीतेकरिता आदिवासी जनजागृती युवा संघटनेचे ॲड.अरविंद सिडाम,मारोती आत्राम, रामकृष्ण सिडाम, गजानन मडचापे ,राजू पंधरे ,संदीप सिडाम,मितराज नैताम, रोहित किनाके, रुपेश नैताम ,रमेश येडस्कर, आदित्य येलादे, कृष्णा मेश्राम, सुदर्शन, निशा कुमरे,अंजली पंधरे, धनश्री पंधरे ,स्वप्नील किलेकर, गणेश कोवे , सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले.