उपविभागीय पोलीस अधिकारी व ठाणेदारांना निवेदन
अजय कंडेवार,वणी :- राजूर येथे खलेआम सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्यासाठी येथील युवकांनी पढाकार घेऊन वणी उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरिक्षक यांना निवेदन देत मागणी करण्यात आले. राजूर येथे मटका पट्टी सुरू असून त्यामध्ये येथील नागरिक आपला पैसा उधळून आपल्या संसाराला उध्वस्त करीत आहेत.
मटक्याच्या माध्यमातून प्रचंड पैसा येईल ह्या भाबड्या आशेने अनेक स्त्रिया, पुरुष व अल्पवयीन सद्धा आपला मेहनतीने कमावलेला पैसा मटका पट्टीत गमावत आहेत. अनेक लोक आपला पगार, तर काही जण आपले साहित्य सद्धा विकून ह्या मटका पट्टीत आपले नशीब चमकविण्याच्या भ्रमात पडले आहेत. परिणामी या लोकांचे संसार उध्वस्त होत आहे. करीता ताबडतोब येथे सरू असलेला मटका पट्टी व अवैध व्यवसाय बंद करावा अशी मागणी करावी.
अकरम सिद्दीकी, मोसीम हसेन, नावेद शेख, अशफाक अली, मो. असलम, मो. शकील, जलील, गुफरान खान, मो. आझाद, मो. तौसिफ मो. अतिफ, मो. सलमान शाह, हसनन हसेन आदीं व अन्य युवकांनी निवेदनाचे माध्यमातून केली आहे.