•अमरावती विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी
•अरमानचे वडील गावातील प्रतिनिधित्व करण्यात नेहमी अव्वल.
अजय कंडेवार,वणी:– संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी राजूर येथील मो.अरमान मो. असलम ची क्रिकेटच्या पुरुष संघात निवड करण्यात आली आहे.
वणी तालुक्यातील राजूर कॉलरी येथील बीएससी च्या प्रथम वर्षाला शिक्षण घेत असलेल्या १९ वर्षीय मो.अरमान मो असलम या उत्कृष्ट गोलंदाज असलेल्या युवकाला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. लहानपणापासूनच क्रिकेटची आवड असलेल्या अरमान ला त्याचे वडील मो असलम यांनी नेहमीच पाठबळ दिले आहे. अनेक क्रिकेट सामन्यात अरमान ची भेदक गोलंदाजी बघायला मिळाली. यातच त्याचे मनोबल वाढत गेले. परिवाराचे पाठबळ सुद्धा चांगले मिळाले. परिणामी तो गोलंदाजीत उत्कृष्ट ठरला आहे. अरमान च्या निवडीने त्याचेवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.खेळाडूंसाठीचे प्रशिक्षण शिबिर दि. 13 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी दरम्यान डॉ. पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज, अमरावती येथे घेण्याचे प्रस्तावित आहे. पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ स्पर्धा सुरू आहे.
या निवडीचे श्रेय वडील मो. असलम, आई प्रणिता,मामा संघदीप भगत, केशराबाई लाहोटी महाविद्यालयात अमरावती,प्राचार्य विजयकुमार भांगडीया, प्रा.गजेंद्र रघुवंशी, प्रा. सतीश मोदानी, एनसीए नागपूरचे मुख्य प्रशिक्षक भाकरे, प्रशिक्षक सोहम यांना दिले .