Ajay Wani :- शासनाच्या नियमानुसार ग्रामपंचायतीच्या स्वनिधीतील ५ टक्के निधी दिव्यांगांच्या कल्याणासाठी खर्च करणे बंधनकारक असतानाही अनेक ठिकाणी या तरतुदीची प्रभावी १००% अंमलबजावणी होताना दिसत नाही. मात्र, वणी तालुक्यातील सर्वात मोठ्या गावांपैकी एक असलेल्या राजुर ग्रामपंचायतीत 100 पेक्षा जास्त दिव्यांग असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त आहे. याबाबत नव्याने रुजू झालेल्या सचिवाने पुढाकार घेत दिव्यांग लाभार्थ्यांसाठी जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे. राजूर ग्रामपंचायत सचिव एस. टी.शेंडे यांनी शासन निर्णयाची अंमलबजावणी करत दिव्यांगांना आर्थिक मदतीचा लाभ मिळावा यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू केली आहे. विशेषता राजूर ग्रामपंचायत मध्ये सूत्रांच्या माहितीनुसार नव्याने रुजू झालेले एस.टी.शेंडे हे पहिले सचिव ठरणार आहे, जे दिव्यांगासाठी पाच टक्के निधी शासनाच्या नियमानुसार दिव्यांगाना कल्याणाकरिता वाटप करण्याचे जाहीर पत्र प्रशासक व सचिव यांनी काढून आवाहन केले.
राजूर ग्रामपंचायतीने प्रसिद्ध केलेल्या सूचनेनुसार, पात्र दिव्यांग नागरिकांनी विनंती अर्ज, आधार कार्ड, बँक खाते, मतदान ओळखपत्र, ऑनलाइन अपंगत्व प्रमाणपत्र, रेशन कार्ड आणि UDID कार्ड ही कागदपत्रे राजूर ग्रामपंचायत कार्यालयात तातडीने जमा करावीत. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर शासन नियमानुसार पात्र लाभार्थ्यांना आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
“राजुर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सर्व पात्र दिव्यांग नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे लवकरात लवकर ग्रामपंचायत कार्यालयात जमा करून शासनाच्या ५ टक्के दिव्यांग कल्याण निधीचा लाभ घ्यावा,” असे आवाहन ग्रामपंचायत राजुरचे सचिव एस. टी. शेंडे यांनी केले आहे.

