•अपघातात चालक जखमी तर ट्रकचा समोरील भाग चेंदामेंदा.
•API संजय आत्राम यांची बदली झाल्यापासून “लालपुलिया” परिसरात ट्रकांची रांगच रांग आता कर्मचारीही करताहेत दुर्लक्ष.
•शहरात लहान गाड्यांना “दम” आणि मोठ्या गाड्यांसाठी “हम”…. अशी परिस्थिती वाहतूक प्रशासनाची ?
अजय कंडेवार,वणी :- चंद्रपूर वरून यवतमाळच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रकने उभ्या असलेल्या ट्रकला मागून जबर धडक दिली. या अपघातात ट्रक चालक व वाहक असे दोनजणं जखमी झाले असून त्यांच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरु आहे अशीही माहिती मिळाली,ही घटना दि.12 ऑक्टों.रात्री 10:30 वाजताच्या दरम्यान उभ्या असलेल्या एका अज्ञात ट्रकला मागून भरधाव येणाऱ्या सिमेंटनी भरलेल्या एम एच 31 सिओ 8777 या क्रमांकाच्या ट्रकने जबर धडक दिल्याने अपघात झाला.
हा अपघात इतका भयानक होता की, ट्रकचा समोरील भाग चेंदामेंदा होऊन चालक व वाहक यात तासभर अडकून पडले होते अखेर उपस्थिती नागरिकांनी धाव घेत मदतीचे कार्य केले व जेसीबीच्या साहाय्याने शर्तीचे प्रयत्न करून त्याना सुखरूप बाहेर काढण्यात आले,यावेळी नागरिकांनी एकच गर्दी केली होती, अपघातामुळे काही वेळ महामार्गावरील वाहतूक देखील ठप्प झाली होती. परंतू रस्त्यावर उभा असलेला ट्रक माञ पसार झाला.
“लालपुलिया मार्गांवर रात्रीला नियमबाह्य पद्धतीने ट्रक उभे केले जातात. मागील दोन ते तीन महिन्यात या मार्गांवर अनेक भीषण अपघात झाले आहेत. हे मुख्य मार्गांवर उभे राहणारे ट्रक रस्त्याने मार्गक्रमण करणाऱ्या छोट्या वाहनधारकांसाठी कर्दनकाळ ठरू लागले आहेत. तेंव्हा या रस्त्यांवर उभ्या राहणाऱ्या ट्रकांवर कार्यवाही करून ट्रक मालकांना ताकीद देण्यात आली का? जर असे केले नसेल तर या उभ्या ट्रकांमुळे निष्पाप जीवांचा बळी गेल्यास जबाबदार कोण?API संजय आत्राम यांची बदली झाल्यापासून “लालपुलिया” परिसरात ट्रक रस्त्यावरच आले कारण ते असतांना त्यांचा कर्मचाऱ्यांनी या परिसरात शिस्त लावण्यात आली होती सध्यातरी या परिसरात कोणतीच शिस्त दिसत नाहीत. विशेष एक भाग नक्कीच लक्षात येत आहे की, लहान गाड्यांना “दम “आणि मोठ्या गाड्यांना “हम….” अशीही परिस्थिती वाहतूक प्रशासनाची दिसून येत आहे.