•युवासेनेने दिले निवेदन
अजय कंडेवार,वणी:- आठवडी बाजार ते चौपाटी बार ते घुग्गुस मुख्य रस्त्या बांधकामाची सखोल चौकशी करून संबंधितांनावर कारवाई करण्याकरीता युवासेनेने वणी उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांचा मार्फत यवतमाळ जिल्हाधिकारी यांना निवेदनातून साकडे घातले आहे.
काही वर्षांपूर्वी दीपक चौपाटी ते आठवडी बाजार हा सिमेंट रस्ता बनविण्यात आला. त्यानंतर तोच रस्ता समोर वाढविण्यात आला. व एका वर्षांपूर्वी नगर परिषद अंतर्गत येणारा प्रभाग क्रमांक 6 मधील आठवडी बाजार ते चौपाटी बार ते घुग्गुस मुख्य रस्त्याला जोडणारा डांबरी रस्ता (डी.पी रोड) बनविण्यात आला. हा रस्ता एक पावसाळा सुद्धा सहन करू शकला नाही. एकाच पावसात हा रस्ता धुवून निघाला. एक वर्षाच्या आताच या रस्त्याला जागोजागी खड्डे पडले आहेत. या रस्त्याचे बांधकाम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे दिसून येत आहे. रस्ता बांधकामात वापरण्यात येणारे साहित्य अतिशय निकृष्ट असल्याचे रस्ता कच्चा बनला आहे. या रस्त्याला जागोजागी खड्डे पडले आहेत. तर काही ठिकाणी हा रस्ता पूर्णपणे दबला आहे. याबाबत विस्तृत पडताळणी करून सदर रस्ता पुन्हा बनवून देण्यात यावा.
यावेळी युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे, शिवराम चिडे, प्रफुल बोर्डे, स्वप्नील गट्टेवार, विक्रम कुलकर्णी, चेतन उलमाले, निखिल गट्टेवार आदी उपस्थित होते.