Ajay Kandewar,Wani:- वणी शहरामध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचारार्थ 17 नोव्हेंबर 2024 दुपारी 1 ते 5 वाजे पर्यंत भव्य पदयात्रा आयोजित करण्यात आली असुन, महाविकास आघाडी मधील सर्व घटक पक्षातील काँग्रेस राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना (ऊबाठा), समाजवादी, माकप, आप च्या नेत्यांनी सर्व मतदारांना या प्रचार पदयात्रेमध्ये समाविष्ट होऊन संजय देरकर यांना विजयी करण्याचे आवाहन करणार आहे.
मतदारसंघातील निवडणूकीला आता तीन दिवस शिल्लक आहे. या होऊ घातलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे शिवसेना (उबाठा) पक्षाचे संजय निळकंठ देरकर हे अधिकृतरित्या रिंगणात आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा निवडणुकीचा आखाडा होणार आहे. अशी एकच चर्चा आता रंगत असताना महाविकास आघाडीचे सर्व नेते व घटक पक्ष व हितचिंतक त्यांच्या रविवार दि.17 नोव्हे.होणाऱ्या विशाल शक्तिप्रदर्शन पदयात्रेत हजारोच्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे.
शिवसेनेच्या वतीने संजय निखाडे, दीपक कोकास, सुनिल कातकडे, संतोष माहुरे, शरद ठाकरे, रवी बोढेकर, योगिता मोहोड, डिमन टोंगे, वनिता काळे, गीता उपरे, राजु तुरणकर, प्रकाश कऱ्हाड, अनिल राजूरकर, मधुकर वरडकर,राष्ट्रवादीचे विजय नगराळे, आबिद हुसेन, सूर्यकांत खाडे, दिलिप भोयर, समाजवादी चे रज्जाक पठाण, कॉम्रेड पक्षाचे दिलिप परचाके, कुमार मोहरंपुरी,प्रविण आत्राम, अजय धोबे सह सर्व मोठ्या संख्येने या पदयात्रेत सामील होऊन परिवर्तनाचा आवाज बुलंद करण्याचे आवाहन केले आहे.