•दरोडा व आर्म ॲक्टचे खोटे गुन्हे असा घणाघाती आरोप.
•वाढीव कलमा रद्द करा अशी मागणी.
अजय कंडेवार,वणी:-
जेसीबीच्या मदतीने शहरातील नवकार फर्निचर दुकान तोडणारा आरोपी समीर रंगरेज कडून पोलिसांनी तलवार जप्तीत दाखविली आहे. त्यामुळे या आरोपीवर शस्त्र अधिनियम कलम ४(२५) अन्वये अश्या प्रकारचा गुन्हात वाढ करून पोलीस कोठडीत वाढीची मागणी केली होती. त्यावरून न्यायालयाने सर्व आरोपींना काल दिनांक १८ ऑक्टोंबर रोजी आणखी २ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. त्यावरून या ४ दिवसांत वारंवार वाढत्या कलमा लक्षात घेत वणीतील काही व्यक्ती समाजकार्यात अग्रेसर असणारे व रंगरेज कुटुंबीयांनी या प्रकरणात काहीही कारणे नसतानाही कलम वाढ होत आहे आणि पोलिसांनी तात्काळ खोटे गुन्हे मागे घेऊन या मागिल “रंग ” देणाऱ्याचा चेहरा समोर यावा, याकरिता दि.१९ ऑक्टोंबर रोजी S.D.O व S.D.P.O यांना निवेदनातून साकडे घालण्यात आले.
प्रकरण..
सविस्तर असे की, शहरातील टिळक चौक परिसरात पंकज भंडारी यांच्या मालकीचे नवकार फर्निचर नामक दुकान आहे आणि त्यांचा ताबा त्याजागेवर आहे. मात्र त्या जागेचा ताबा मिळावा याकरिता समीर रंगरेज याने कायदा हातात घेतला बुधवारी अंधाऱ्या रात्री जेसीबी मशिनच्या साह्याने दुकानाची प्रचंड नासधूस केली. यात तब्बल 18 लाख रुपयांचे नुकसान झाले तर एक लाख 70 हजार रुपयांची चोरी झाल्याची तक्रार गुरुवारी वणी पोलिसात नोंदविण्यात आली. ठाणेदार अजित जाधव यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता ,तातडीने गुन्हा दाखल केला. पोलीसांनी तपासाची चक्रे हालवून घटनास्थळी वापरण्यात आलेले जेसीबी मशिन व ऑपरेटर यांना तात्काळ ताब्यात घेतले होते.
मात्र या प्रकरणातील त्यावर गुन्हे ही दाखल झाले परंतू अवघ्या या 4 दिवसातच नव नविन कलमे वाढविण्यात आल्याने शहरात विविध चर्चा सुरु झाली. यात कोणी आतून हवा तर देत नसावा…? आणि जर असे असेल” तो रंग ” आणणारा” कोण” त्याला शोधून जनतेसमोर आणा व वाढीव खोटे गुन्हे तात्काळ मागें घ्या ,अशी जोरदार मागणीही करण्यात आली . या निवेदनाचा प्रतीलीपी म. रा . गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, यवतमाळ पालकमंत्री संजय राठोड, यवतमाळ पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड व वणी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना पाठविण्यात आले .
यावेळी निवेदन देताना शहरातील सामाजिक कार्यकर्ते, महिला व नागरीक उपस्थित होते.