• कोणीतरी ‘दोन्हीं तबल्यावर’ खेळत असल्याचीही खमंग चर्चा.
•खुद के घर “दिवाली” ओर लोगो के घर “दिवाला” निकालने वाला कब आयेगा सामने अशी आर्त हाक.
अजय कंडेवार,वणी :- जेसीबीच्या मदतीने शहरातील नवकार फर्निचर दुकान तोडणारा आरोपी समीर रंगरेज कडून पोलिसांनी तलवार जप्तीत दाखविली आहे. त्यामुळे या आरोपीवर शस्त्र अधिनियम कलम ४(२५) अन्वये अश्या प्रकारचा गुन्हात वाढ करण्यात आली होती.वारंवार वाढत्या कलमा लक्षात घेत वणीतील काही व्यक्ती समाजकार्यात अग्रेसर असणारे व “रंगरेज” कुटुंबीयांनी या प्रकरणात काहीही कारणे नसतानाही कलम वाढ होत आहे आणि पोलिसांनी तात्काळ खोटे गुन्हे मागे घेऊन या मागिल “रंग ” देणाऱ्याचा चेहरा समोर यावा, याकरिता दि.१९ ऑक्टोंबर रोजी S.D.O व S.D.P.O यांना निवेदनातून साकडेही घालण्यात आले होते.
सविस्तर असे की, शहरातील टिळक चौक परिसरात एक फर्निचर दुकान आहे आणि त्यांचा ताबा त्याजागेवर आहे. मात्र त्या जागेचा ताबा मिळावा याकरिता समीर रंगरेज याने कायदा हातात घेतला बुधवारी अंधाऱ्या रात्री जेसीबी मशिनच्या साह्याने दुकानाची प्रचंड नासधूस केली. यात तब्बल 18 लाख रुपयांचे नुकसान झाले तर एक लाख 70 हजार रुपयांची चोरी झाल्याची तक्रार वणी पोलिसात नोंदविण्यात आली होतो. ठाणेदार अजित जाधव यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता ,तातडीने गुन्हा दाखल केला होता. पोलीसांनी तपासाची चक्रे हालवून घटनास्थळी वापरण्यात आलेले जेसीबी मशिन व ऑपरेटर यांना तात्काळ ताब्यात घेतले होते.
मात्र या प्रकरणातील त्यावर विविध गुन्हे ही दाखल झाले आणि परंतू या अवघ्या या 4 दिवसातच नव नविन कलमे वाढविण्यात आल्याने शहरात विविध चर्चा सुरु झाली. यात कोणी आतून हवा तर देत नसावा…? आणि जर असे असेल” तो रंग ” आणणारा” कोण” त्याला शोधून जनतेसमोर आणा व वाढीव खोटे गुन्हे तात्काळ मागें घ्या ,अशी मागणी केली होती मात्र अद्यापही” तो ” कोण असे असतानाही शोध माञ अपूर्ण आहे असा स्पष्ट आरोपही होत आहे. परंतू आतून या प्रकरणाला सांभाळ करीत स्वतः “Safe Zone “मधे असणारा समोर कधी येईल… याची सर्वांनाच वाट आहे परंतू येत्या काही दिवसात लवकरच उघड होईल का ? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
या प्रकरणात त्या रात्री कर्तव्यावर असणारा एक पोलिस अधिकारी यांना पोलिस अधीक्षकांनी कसुरीवर उचलबांगडी करीत थेट “हेड क्वार्टर” ला जमा करण्यात आले परंतू या मागिल”तो ” हवा देणारा अद्यापही मोकाटच? यालाही समोर आणा अशी वणी शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.