Ajay Kandewar,वणी :- वणी विधानसभा ही विविध खनिज संपत्तीने नटलेली विधानसभा असुन या ठिकाणी विविध कलावंत, व अनेक मोठ्या नेत्यांनी आपल्या राजकीय प्रवासात जन्म घेतला आहे. त्यामुळे अनेक संकल्पना त्यांच्या अंगीकृत आहेत. युवासेना वणी विधानसभा समन्वयक आयुष रोहिदास ठाकरे यांच्या संकल्पनेतुन शिवसेना २०२५ मराठी दिनदर्शिकेचे प्रकाशन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने युवासेना प्रमुख तथा आमदार आदित्य उद्धव साहेब ठाकरे व आमदार संजय भाऊ देरकर यांच्या हस्ते पार पडले.
या दिनदर्शिकेत अनेक लोकहिताच्या मागण्यां घेऊन शासकीय दरबारी आवाज उचलुन व त्यावर झालेल्या परिणामांच्या रूपाने जनसेवेची तळमळ व जनतेप्रति असलेले मराठी माणसाप्रति प्रेम स्पष्ट होते. अनेक विकास कामांचा दुजोरा व गोर गरिबांच्या प्रश्न सोडविण्याकरिता केलेले प्रयत्न यात दाखविण्यात आले असुन.
दिनदर्शिका प्रत्येक घरा घरात पोहोचवून शिवसेनेची व युवासेनेची विचारधारा आम्ही जनतेपर्यंत पोहोचवू असे सुद्धा यावेळी युवासेना वणी विधानसभा समन्वयक आयुष रोहिदास ठाकरे यांनी बोलून दाखविले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने युवासेना प्रमुख तथा आमदार आदित्य उद्धव साहेब ठाकरे व आमदार संजय देरकर यांच्या हस्ते आयुष ठाकरे युवासेना समन्व्यक यांचे संकल्पनेतुन साकारलेली शिवसेना (उबाठा) दिनदर्शिका २०२५ प्रकाशित करण्यात आली. यावेळी समीर लेनगुळे युवा सेना समन्व्यक यवतमाळ, सूरज पिदूरकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.