Sad News | वणी येथे वास्तव्यास असलेल्या बापुराव यल्लन्ना चाटे यांची धर्मपत्नी तथा रमेश बापुराव चाटे यांची आई यशोदा बापुराव चाटे यांचे बुधवार दिनांक ३० ऑक्टोबरला रात्री ८.३० वाजता दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी आजीबाईनी शंभरी वर्षे ओलांडल्या होत्या. Yashodha Chate passed away.
यशोदा बापुराव चाटे शतायुषी व्हाव्यात अशी चाटे परिवाराची इच्छा होती. त्या सूरज चाटे यांच्या आजी होत्या. यशोदाबाई यांना कधीच कोणताही मोठा आजार जडला नाही. परंतु मागील काही महिन्यापासून वृद्धापकाळाने ग्रासल्याने त्यांची प्रकृती ढासळली होती. अखेर बुधवारी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांचे पश्चात पती,मुलं, सुना, नातू, पणतू असा मोठा गोतावळा आहे.त्यांचेवर वणी येथे दुपारी १२.वाजता वणी येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.