Thursday, March 5, 2026
HomeMohadaमोहद्यात मजुरांच्या हक्कासाठी उपसरपंच रासेकर यांची धडपड....

मोहद्यात मजुरांच्या हक्कासाठी उपसरपंच रासेकर यांची धडपड….

•रेशन कार्डामुळे मिळाला दिलासा.

Ajay Kandewar,Wani :- तालुक्यातील मोहदा परिसरात मागील 15 ते 20 वर्षांपासून गिट्टी क्रशरवर दगड फोडणे आणि गाड्यांमध्ये दगड भरण्याचे काम मोठ्या प्रमाणावर केले जात होते. या काळात महाराष्ट्राबाहेरील अनेक मजूर आपल्या उदरनिर्वाहासाठी येथे आले.मात्र,आता क्रशर उद्योगात यंत्रसामग्री (मशिनरी) बसवल्यानंतर या मजुरांच्या रोजगारावर परिणाम झाला असून त्यांपैकी काहीजण मोहद्यात स्थायिक झाले आहेत.

सध्या हे मजूर आणि त्यांची कुटुंबे शेतमजुरी करून आपले जगणे भागवत आहेत. अशा परिस्थितीत या महिलांना शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत रेशन कार्ड मिळणे ही मोठी दिलासादायक बाब ठरली आहे. रेशन कार्डमुळे त्यांना स्वस्त दरात अन्नधान्य उपलब्ध होणार असून, ही सुविधा त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.तसेच हे रेशन कार्ड त्यांच्या ओळख व पत्त्याचा पुरावा म्हणून वापरले जाणार आहे, ज्यामुळे त्यांना आरोग्यसेवा,शिक्षण आणि इतर सरकारी योजनांचा लाभ घेणे सुलभ होईल.या सर्व प्रक्रियेसाठी मोहदा ग्रामपंचायतीचे उपसरपंच सचिन रासेकर यांनी पुढाकार घेतला असून, त्यांच्या प्रयत्नातून या स्थलांतरित महिलांना शासनाच्या योजनेचा थेट लाभ मिळवून देण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page