•सरपंच वर्षा राजूरकर यांचा प्रयत्नाला यश
•आ.बोदकुवार यांचा हस्ते लोकार्पण.
अजय कंडेवार,वणी :- मोहदा ग्रामपंचायतचे तडफदार सरपंच वर्षा राजूरकर यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असुन परिसरात तब्बल सव्वा कोटीचे विकासकामे होवू घातले आहे. याच विकासकामांचे विधानसभा मतदारसंघाचे आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे हस्ते दि. 26 मे ला लोकार्पण तसेच भुमीपुजनही करण्यात आले.Development works worth half a crore in Mohada…!Success to Sarpanch Varsha Rajurkar’s efforts ,Inauguration of A. Bodkuwar.
ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद यवतमाळ जल जीवन मिशन कार्यक्रम सन २०२२-२३ अंतर्गत मोहदा येथे (ता. वणी) नळ पाणी पुरवठा योजना करणे प्राकलित किंमत रु. ९९.२४५ लक्ष व आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत मंजूर किंमत १० लक्ष नारायण राजुरकर ते कृष्णानपूर पांदन रस्त्यापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे,आ. संजीव रेड्डी बोदकूरवार यांच्या प्रयत्नाने मंजूर झाले असून या कामाचे भूमिपूजन आ. संजीव रेड्डी बोदकूरवार यांच्या हस्ते करण्यात आले.मतदारसंघातील सर्व रस्त्यांचे नुतनीकरण आणि मजबुतीकरण करण्याचे ध्येय असताना यासोबतच मोहदा सह परिसरातील गावांच्या सर्व समस्या लवकरच सोडविल्या जातील अशी ग्वाही आ. संजीव रेड्डी बोदकूरवार यांनी मोहदा दरम्यान अर्थसंकल्पीय कामे अंतर्गत ९९.२४५ लक्ष तथा १० लक्ष निधी मंजूर झालेल्या रस्ता कामाच्या लोकार्पण व भूमिपूजन प्रसंगी दिली.
प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे आणि आमदारांच्या विकासाभीमुख कार्यामुळे परिसरातील समस्या कायमस्वरुपी सुटतांना दिसत आहे. मोहदा गावाला विकासाकरीता प्राप्त झालेला निधी आणि होत असलेल्या कामांमुळे गावात आनंद व्यक्त होत आहे.कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी पंचायत समिती सभापती संजय पिंपळशेंडे, तर प्रमुख उपस्थिती दिनकरराव पावडे, वर्षा रवींद्र राजुरकर (सरपंच) आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच सचिन ज्ञानेश्वर रासेकर (उपसरपंच),गणेश बोन्डे, ग्रा. पं सदस्य, गजानन शेलवडे, ग्रा पं सदस्य, अर्चना गेडाम, ग्रा. पं सदस्या, सीमा ढूमने, ग्रा पं सदस्या, बेबी उईके, सदस्या, शोभा टेकाम, सदस्या, सुवर्णा बोन्डे सदस्या राजकुमार वडस्कर, श्रीकांत पा. कुचणकर, विशाल पा. कुचणकर, ज्ञानेश्वर पा. येसेकर, निकास शेंडे, रुपेश राजूरकर, गणेश लोडे, वामन पा. कुचणकर, नारायण पा. राजूरकर, सुधीर रासेकर, रवींद्र राजूरकर, वामन उईके, मनोज गेडाम, संदीप ढुंमणे, प्रवीण बोन्डे, विलास टेकाम, रामदास बोन्डे, प्रफुल बोन्डे, खलील शेख, गणेश रासेकर, विनोद नक्षीने, सुधाकर शंकावर, प्रफुल बोन्डे, प्रीतम रासेकर,अंकुश पुनवटकर, सदानंद राजूरकर आदीसह या कार्यक्रमाला समस्त मोहदावासी उपस्थित होते.