वणी विधानसभा क्षेत्रात “विजय चोरडिया” बनले “आधार”
अजय कंडेवार,वणी :- वणी विधानसभा क्षेत्रात सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे तसेच सर्वांनाच आधार देणारे भाजपचे प्रदेश सदस्य, उद्योजक पारसमल चोरडिया फाउंडेशनचे प्रमुख विजय चोरडिया यांनी अनेक सामाजिक कार्य तसेच उपक्रम घेतले असून राजेश्वर शिवमंदिर मुकुटबन येथे घेण्यात आलेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया व चष्मे वाटप कार्यक्रमात 387 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यातीलच 62 रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम येथे पाठवण्यात आले व अन्य 38 रुग्ण जाणार आहेत.
तसेच भालर येथे 18 नोव्हेंबरला मोतीबिंदू शस्त्रक्रिया व मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजन जिल्हा परिषद शाळेत केले होते. या शिबिरामध्ये 360 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 32 रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम येथे पाठवण्यात आले आहे.तसेच या कार्यक्रमात चष्मेकरिता नंबर काढण्यात आले.येत्या 5 डिसे. ला हजारों चष्मेही वाटप करण्यात येणार असल्याची माहिती विजय चोरडीया यांनी दिली.