•’सूरज’ फरार, पो.स्टे.गून्हे दाखल.
प्रकाश खिल्लारे, पुसद:- तालुक्यातील वालतुर रेल्वे येथे राहणाऱ्या तरुणाने एका २३ वर्षीय तरुणी सोबत मैत्री करुन प्रेमाच्या जाळ्यात ओढले व काकाच्या घरी कोणी नसतांना बोलावून तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवत युवकाने तिचे काही अश्लील फोटो,व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत, तिच्याकडून बळजबरीने लैंगिक शोषण केले. त्यानंतरही तिला धमकी देत,तिचे सातत्याने लैंगिक शोषण केले. त्याच्या छळाला कंटाळून 23 वर्षीय तरुणीने पालकांना आपबिती सांगितली यावरून तरुणीने या प्रकरणात थेट पोलिसस्टेशन गाठले असता वसंत नगर पोलीस ठाण्यामध्ये दि.24 डिसें.रोजी दिलेल्या तक्रारीवरून विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
सुरज दिलीप धुळे (वय ३०) वर्षे रा.वालतुर रेल्वे , ता.पुसद, जि.यवतमाळ असे गुन्हे दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार सूरजने गावातच राहणाऱ्या २३ वर्षीय तरुणी सोबत मैत्री जमवली. त्यानंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून काकाच्या घरी कोणी नसताना बोलावून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्याने शारीरिक संबंध प्रस्थापित करीत असताना फोटो सुद्धा काढले होते.ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करतो अशी धमकी देत वारंवार शारीरिक अत्याचार करीत होता.बदनामीच्या भीतीने तरुणी देखील त्याच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होती.घटनेच्या दिवशी तरुणाने शरीर सुखाची मागणी केली होती.अशावेळी तरुणीने साफ नकार दिल्याने सोशल मीडियावर फोटो व्हायरल करतो अशी धमकी दिल्याने घाबरलेल्या तरुणीने आपबिती तिच्या आई-वडिलाला सांगितली.त्यानंतर पुसद येथील वसंत नगर पोलीस गाठून गावात राहणाऱ्या सुरज विरोधात रितसर तक्रार दिली. या प्रकरणी युवकाविरोधात ठाण्यात कलम 376 (2)(N),506 या भा .द.वी कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलें
सदर तपास Dysp पंकज अतुलकर यांचा मार्गदर्शनात वसंत नगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार P.I प्रविण नाचणकर यांच्या आदेशाने PSI आशिष झिमटे, अशोक चव्हाण, मुन्ना आडे,संजय पवार, सतिश सिदे व गजानन जाधव करीत आहे.