•पर्यावरणाचे संरक्षण व्हावे यासाठी हा उपक्रम
अजय कंडेवार,वणी :- शहरातील मॅकरून सि.बी.एस.ई शाळेत नुकताच ” ग्रीन डे ” अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेचा परिसरात 145 वृक्षांचे वृक्षारोपणही विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा हस्ते करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यानी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभाग नोंदविला. या कार्यक्रमात सर्व विद्यार्थी व शिक्षिक हिरव्या रंगाचे कपडे परिधान करून आले होते व इको क्लबचे विद्यार्थी विराज उमेश पोद्दार,संकेत पानघाटे ,यथार्थ सोनटक्के,विभोर रामटेके ,सैव शेख या विद्यार्थ्यांनी प्रकृती संतुलन ठेवल्याने काय फायदे होतात आणि वृक्ष कत्तल केल्याने काय तोटे होतात आणि त्या पासून मानवी जीवन तसेच निसर्गातील प्राण्यांवर काय दुष्परिणाम होतात याचा संदेश देणारे यावर एक नाट्य सादर करण्यात आले आणि निसर्गाचे महत्वही अतिशय चांगल्या पद्धतीने पटवून दिले. पर्यावरणाचे संरक्षण व्हावे व विद्यार्थ्यांना झाडे तसेच पर्यावरणाची ओळख व्हावी, यादृष्टीने हा उपक्रम राबवण्यात आला.शाळेतील परिसरात एकूण 145 वृक्षांचे वृक्षारोपन करण्यात आले.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका शोभना मॅडम होत्या. कार्यक्रमाचे संचालन श्रावणी येवले आणि सनया कठाने यांनी केले.रंगमंच सजावट शिक्षिका शबनम शेख व शारीरिक शिक्षक सुधीर लडके यांचा मार्गदर्शनाखाली इको क्लबचा विद्यार्थ्यानी नाट्य सादर केले तसेच समस्त शिक्षक वृंद यांनी या उपक्रमाला यशस्वीतेकरीता सहकार्य केले.

