अजय कंडेवार,वणी:- ५.सप्टे.रोजी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त देशभर विविध कार्यक्रम साजरे होत असताना मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी (सिटी ब्रांच) वतीने स्वयंशासन दिनाचे आयोजन केले होते.
शाळेचा काही विद्यार्थ्यांनी शाळेचे चेयरमन,मुख्याध्यापक म्हणूनही कामकाज पाहिले. त्यानंतर काहीं शिक्षक बनलेल्या विद्यार्थ्यांनी परिपाठापासून ते सर्व तासिका शिकवण्याचे काम केले. यात अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला.अशा प्रकारे मुलांनी शिक्षक दिन साजरा केला.तसेच संस्थेचे उपसंचालक पियूष आंबटकर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले,”यशस्वी जीवनाची पायाभरणी ही शालेय शिक्षणातूनच होते. नंतरच्या काळात उच्च शिक्षण घेतानाच निश्चित ध्येय डोळ्यासमोर ठेवूनच पुढील वाटचाल केली पाहिजे.विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिनातील सहभाग हा केवळ शिक्षक होण्याचा अनुभव देणारा नसून, भविष्याला आकार देणारी रूची, कला दर्शविणारे एक प्रतीक असते. मुख्याध्यापक, शिक्षक, लिपीक, सेवक व विद्यार्थी यांच्या तांत्रिक सुसंवादाची जाणीव निर्माण होते. स्वयंशासन हा एकदिवसीय अनुभव अन् आनंद वाढवणारा असतो. तसेच भविष्यात यशाची दिशादर्शक ठरतो म्हणून विद्यार्थी ही आठवण आयुष्यभर जपतो. हाच मागिल हेतू …
जाहिरात….
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित म्हणून संस्थेचे उपसंचालक पियूष आंबटकर हे होते. या कार्यक्रमांचा यशस्वीतेकरीता मुख्यद्यापक व समस्त शिक्षकांनी सहकार्य केले.