अजय कंडेवार,वणी:- मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी सि.बी.एस. ई.शाळेत शिक्षक दिन काल दिनांक 5 सप्टे. सोमवार रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थी प्रतिनिधींनी सर्व शिक्षकांना पुष्प देत स्वागत करण्यात आले.
डॉ .सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा प्रतिमेला शाळेचा मुख्यद्यापिका यांचा हस्ते हार अर्पण करण्यात आले तसेच मानवंदन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यात शाळेच्या दहावीचा विद्यार्थ्यानी नृत्य सादर केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी भाषण, नृत्य, व गायन अशा दर्जेदार कार्यक्रमांचे सादरीकरण केले. शिक्षकांसाठी खेळाचे आयोजन विद्यार्थ्यांनी केले होते. सर्व शिक्षकांनी या कार्यक्रमाचा आवर्जून आनंद घेतला व शिक्षकांनीही भाषणे केली.
या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी शाळेचा मुख्यद्यापिका शोभना मॅडम होत्या . त्यानी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले की, “आधुनिक काळात अशी चित्र बघावयास मिळत आहे की, विद्यार्थी फक्त एक दिवस शिक्षकाना आदर भर भरुन करतो आणि वर्षभर पुनः जैसे थे….. ची स्थिती जाणवते.मला एव्हढंच याप्रसंगी म्हणायचे आहे विद्यार्थी दशेत असतांना प्रत्येकाने शिक्षकाना निरंतर आदर दिलाच पाहिजे कारण शिक्षक म्हणजे जीवन बदलणारा गुरूच…”
यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तमन्ना लभाने व त्रिशा गोंडे यांनी केले तर कार्यक्रमाच्या अखेरीस मनोगत व्यक्त केले. सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी सादर केलेल्या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थ्यांचे समस्त शिक्षकांनी कौतुक देखील केले.