•निवडणुका कशा पद्धतीने होतात याचा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव घेता यावा यासाठी हा उपक्रम – शोभना मॅडम (मुख्यद्यापक,MSA, वणी)
अजय कंडेवार,वणी :- मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी शाळेच्या कॅम्पसमध्ये हेड बॉय आणि हेड गर्ल”या पदासाठी मॅकरून शाळेचा मुख्याध्यापिका शोभना मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना लोकशाहीतून होणाऱ्या देशातील निवडणुका शालेय जीवनातच समजाव्यात यासाठी हा प्रयोग करत ही एक आगळवेगळी (cabinet) शालेय निवडणूक दि.8.जुलैला पार पाडत (cabinet) शालेय मंत्रिमंडळाचे खातेवाटपही करण्यात आले.
शाळेचा मुख्यध्यापकाकडून सर्व उमेदवारांसाठी चिन्हे देण्यात आली होती, तर शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याचे ओळखपत्र तपासून त्यांच्या बोटाला शाई लावून मोबाईलवरील चिन्हासमोरील नावापुढे बटन दाबण्यास सांगण्यात आले. यासाठी 2 दिवस प्रचार करून प्रत्येक जण आपापल्या उमेदवाराचे चिन्ह घेऊन प्रचार प्रमुखांच्या बरोबर प्रत्येक वर्गात जाऊन सभा घेत होते. मैदानावर, शाळेच्या हॉलमध्ये जाऊन 6 उमेदवार आपापल्या परीने आठवी ते दहावी मतदारांना जागरूक राहून मतदान करण्यासाठी आवाहन करत होते. येलो, ग्रीन, ब्ल्यू,या तिन्ही हाऊसमधील विद्यार्थी आपापल्या परीने प्रचार करत होते. “भविष्यात मी तुमच्यासाठी काय काय काम करेन?” याची आश्वासक यादी सर्व विद्यार्थ्यांना सांगत होते. आपापल्या निवडणुकीच्या चिन्हाबरोबर प्रत्येक वर्गात जाऊन त्यांनी मुलांची मने तर जिंकली. या निवडणुकीत 10वी चे विद्यार्थी देवांशू पावडे मुख्यमंत्री (हेड बॉय) आणि सना रहेमान उपमुख्यमंत्री(हेड गर्ल) म्हणून विजयी झाले.
असा पार पडला कार्यक्रम……सर्व शिक्षकांनी आपापल्या वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना मतदानाबाबत माहिती दिली. या शैक्षणिक वर्षामध्ये शालेय अभ्यासक्रमाबरोबरच सहशालेय उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने शाळा- शाळांमध्ये शालेय मंत्रिमंडळाची निर्मिती केली जाते. प्रत्येक वर्गातून दोन वर्ग प्रतिनिधींची निवड करून त्यांच्यातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदासाठी गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक घेण्यात आली.
” लोकशाहीत विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका कशा पद्धतीने होतात याचा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव घेता यावा यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. या वेळी मुख्याध्यापिका शोभना मॅडम यांचा सुंदर अश्या मार्गदर्शनात पार पडला .या कार्यक्रमाची सर्व शिक्षकांनी आपापल्या वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना मतदानाबाबत माहिती दिली.
“या शैक्षणिक वर्षामध्ये शालेय अभ्यासक्रमाबरोबरच सहशालेय उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने शाळा- शाळांमध्ये शालेय मंत्रिमंडळाची निर्मिती केली जाते. प्रत्येक वर्गातून दोन वर्ग प्रतिनिधींची निवड करून त्यांच्यातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदासाठी गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक घेण्यात आली आणि शिक्षकांचे विद्यार्थांना मोलाचे मार्गदर्शन लाभले, असे सांगण्यात आले.”-शोभना मॅडम (मुख्यद्यापक,MSA, वणी)
असे झाले खातेवाटप शालेय मंत्रिमंडळ……:-हेडबॉय- हेड गर्ल, असिस्टंट हेड बॉय- असिस्टंट हेड गर्ल, कल्चरल सेक्रेटरी, आरोग्य मंत्री, सांस्कृतिक मंत्री, पर्यावरण मंत्री, स्वच्छता मंत्री, सजावट मंत्री या विविध खात्यांसाठी विद्यार्थ्यांची मंत्रिमंडळात निवड करण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्यद्यापिका शोभना मॅडम, समस्त शिक्षकवृदं व विद्यार्थी उपस्थित होते. या निवडणूक कार्यक्रमाला यशस्वीरित्या पार पडण्याकरीता समस्त शिक्षकांनी सहकार्य केले .