Ajay Kandewar,Wani:- राज्यातील मराठा आरक्षण ओबीसी (OBC) प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या निर्णयाविरोधात संताप आणि मानसिक तणावातून यवतमाळ जिल्ह्यातील मृतक अजय पुंडलीक शेंडे (वय ३०, रा. कायर, ता. वणी, जि. यवतमाळ) या विवाहित तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
३० सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेत अजय शेंडे यांनी वणी येथील एका कृषी केंद्रातून खरेदी केलेले मोनोसिल (२५० मि.ली.) हे कीटकनाशक औषध घेतल्याचे बिल सहित पुरावा मिळाल्याने ती घेतलेली औषध प्राशन करून आत्महत्या केली. घटनास्थळी मिळालेल्या चिठ्ठीत त्यांनी “मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देण्याच्या निर्णयामुळे मानसिक आघात झाल्याने आत्महत्या करीत आहे” असे लिहिल्याचे समजते.मृतक अजय शेंडे हे गरीब मजुर कुटुंबातील असून, त्यांच्या मागे पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, अ.भा. महात्मा फुले समता परिषद अध्यक्षा सुनैना यवतकर यांनी या प्रकरणात पुढाकार घेत जिल्हाधिकारी मार्फत पालकमंत्री संजय राठोड यांना निवेदन देऊन शेंडे कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत व शासकीय नोकरी देण्याची मागणी केली आहे.

