•मादगी समाजाचा वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा संपन्न.
अजय कंडेवार,वणी:- आजच्या विद्यार्थ्यांना ज्ञानी आणि प्रगल्भ बनवायचे असेल तर शालेय अभ्यासक्रमातील वाचनाव्यतिरिक्त इतर वाचनाचीही गोडी पालकांनी मुलांना लावावी ,पालकांनी स्वतःचा चैनीचा किंवा गरजेचा वस्तू एकवेळ नाही घेतले तरी चालेल त्याऐवजी स्वत: त्याच पैश्याने जर घरी नवनवीन पुस्तके आणून ठेवाल तर घरातील मुले ते पुस्तके वाचतीलच आणि अश्या प्रकारे जर मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण केल्यास नवी पीढी समृद्ध भवितव्य घडवेल,असे प्रतिपादन लो.टि महाविद्यालयाचे अर्थशास्त्र प्रमुख प्रा.डॉ.करमसिंग राजपूत यांनी वसंत जिनिंग येथे मादगी बहुउददेशीय संस्था, वणीच्या वतीने (दि.6.ऑगस्ट) रोजी आयोजित गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात मार्गदर्शनपर भाषणात ते बोलत होते.The young generation is averse to reading and parents should bring the youth to reading – Prof. Dr. Karamsingh Rajput.On behalf of Madagi Samaj, meritorious students were felicitated..
प्रा.डॉ. करमसिंग राजपूत व्यासपीठावरून विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करतांना टिपलेले क्षण……..
सोहळ्याचे उद्घाटन प्रा.सुनिल मिद्दे (महासचिव महासंघ, (M4)यांच्या हस्ते झाले. उद्घाटन भाषणात समाजाचा विद्यार्थ्यांचा पुढील अभ्यासक्रमात गरजू विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची मदत महासंघाचा माध्यमातून करण्यात येईल असे आश्वासनही केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष चरणदास कोंडावार (माजी नायब तहसीलदार) हे होते.या अध्यक्षीय भाषणात “विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच कठोर परिश्रम व जिद्द बाळगल्यास बिकट परिस्थितीवरही सहजपणे मात करता येते असे प्रतिपादन केले. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून मुरलीधर लाटेलवार (उपकोषाध्यक्ष महासंघ,(M4), विठ्ठल शंकावार (जेष्ठ समाजसेवक), व्यकंटी अंधेवार, प्रदिप आधारे (उपाध्यक्ष M4),BMS अध्यक्ष निलेश परगंटीवार,सूरज चाटे, रवि कोमलवार, दिपक गुल्लमवार, जी.आर्.रेड्डी,नत्थु नगराळे आदी उपस्थित होते.
या सोहळ्यात दहावी व बारावी परिक्षेत गुणवंत विद्यार्थी तसेच इतर विविध प्रकारच्या परिक्षेत विशेष प्राविण्य संपादन केलेल्या पन्नास पेक्षा जास्त विद्यार्थ्याचा प्रमाणपत्र व स्मृती चिन्ह प्रदान करुन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच समाजात अनेक क्षेत्रात सेवा करणाऱ्या जसे वैद्यकीय, शिक्षण, पोलिस विभाग, राजकीय, सामाजिक या क्षेत्रातील व्यक्तींचाही विशेष सत्कार घेण्यात आला.यावेळी पालक व विदयार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन प्रकाश तालावार व अजय कंडेवार यांनी केले तर आभारप्रदर्शन अरुण एनपेल्लिवार यांनी केले. या कार्यक्रमाचा यशस्वितेसाठी राकेश शंकावार, किशोर मंथनवार,विक्की पगंटीवार, विजय कंडेवार, रीतिक मामिडवार, रीतिक बेलेकर,शिवकुमार नलभोगे, प्रभाकर लिक्केवार, कैलास पौन्नलवार व आदी समाजबांधवांनी केले.