•सरपंच रुपेश ठाकरे यांनी दिले निवेदन
अजय कंडेवार,वणी :- मुंगोली परिसरात मुक्त संचार करत असलेल्या वाघाचा बंदोबस्त करत पर्यंत प्रभावित क्षेत्रात रात्रभर सायरन वाजवून नागरिकांना सुरक्षा देण्याकरिता मुंगोलीचे सरपंच रुपेश ठाकरे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) यांना निवेदनाव्दारे साकडे घातले आहे.
मुंगोली, माथोली, कैलाशनगर, साखरा, कोलगाव, चिखली, टाकली, शिवणी (जहागीर), येनक परिसरात वे. को.लि. वणी एरिया च्या मुंगोली व कोलगाव खुल्या खदानी असून इथे मातीचे मोठ-मोठे ढिगारे व ऑस्ट्रेलियन बाभळीचे जंगल आहे.या परिसरात वाघाचा बऱ्याच दिवसापासून मुक्त संचार सुरु असून शनिवार दि. २९/१०/२०२२ ला सकाळी च कोलगाव सबएरिया ऑफिस जवळ टाकली गावाला जाणाऱ्या रोडवर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनीच गावकरी तसेच सरपंच टाकळी सोबत वाघाचे दर्शन घेतले.त्यानंतर रविवार दि. ३०/१०/२०२२ रोजी सायंकाळी (कैलाशनगर) माथोली परिसरात प्रकाश मडावी यांच्या गायीला वाघाने गोठ्यात जाऊन जखमी केले व काही वकन्या सुद्धा जखमी केल्या.
सोमवार दि. ३१/१०/२०२२ ला दिवसभरात वाघ हा मुंगोली परिसरात वावरत असून रात्री मुंगोली येथील गायीला जखमी केले व गावकर्यांना दर्शन दिले असून रात्री मुंगोली येथील गायीला जखमी केले व आज सकाळीच ९ वाजता मुंगोली बस स्थानकाजवळ वाघाने दर्शन दिले असून तो आताही वाघ मुंगोली गावाच्या परिसरात आहे.वाघाच्या मुक्त संचारामुळे परिसरात दहशत निर्माण झाली असून गावकरी भयभीत आहे. त्यामुळे या परिसरात मुक्त संचार करत असलेल्या वाघाचा बंदोबस्त करण्याचे नियोजन करण्यात यावे व वाघाचे बंदोबस्त करत पर्यंत प्रभावित क्षेत्रात सायरन वाजऊन नागरिकांना सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी करीत आहे.