अजय कंडेवार,वणी:- तालुक्यातील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये “बालक दिवस” व “क्रीडा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला .बाल दिन हा एक खास बालकांसाठी विशेष दिवस म्हणून जगभर वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाच्या शिफारशीवरून २० नोव्हेंबर हा ‘जागतिक बाल दिन’ अनेक देशांत साजरा होतो. भारतात, भारताचे प्रथम पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन (१४ नोव्हेंबर) हा बाल दिन म्हणून साजरा केला जातो.वार्षिक क्रीडा दिनानिमित्त स्किपिंग रेस, संगीत खुर्ची, खो-खो, क्रिकेट, धावण्याची शर्यत, रस्सीखेच, थ्रीलेग रेस, आदींचे आयोजन करण्यांत आले होते. त्यात प्ले ग्रुप ते ६ वी इयत्तेपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. क्रीडा दिन यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक सुरज कडकर व विनित भोयर, सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतलेत.सर्व पालकांनी सुध्दा मुलांना प्रतिसाद देत कार्यक्रमाची सांगता ‘आनंद मेळावा ‘चा आस्वाद घेवून व देवून आनंद द्वीगुणीत केला.
त्यात प्रमुख अतिथी म्हणून स्नेहदीप काटकर (विभागीय शिक्षण अधिकारी)तसेच डॉ. अरुण विधाते (वैद्यकीय अधिकारी)ह्यांच्या उपस्थितीत लहान- लहान मुलांचा आनंद द्विगुणीत झाला.शाळेच्या मुख्याध्यापिका लता रफेल तसेच शाळेचे मान्यवर रमेश सुंकुरवार(संचालक) व राहुल संकुरवार यांनी उत्साहवर्धक वातावरणांत मुलांचा आत्मविश्वास वाढविला.