•दोन वर्षावरील व्यक्तींनी गोळीचे सेवन करणे गरजेचे
नागेश रायपूरे, मारेगाव:- केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत हत्तीरोग दुरीकरणासाठी मारेगावं तालुक्यामध्ये सार्वत्रिक औषधोपचार मोहीम दिनांक 06 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर 2022 या कालावधी मध्ये राबविण्यात येत आहे.
आपल्या आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने दोन वर्षावरील सर्वांनी डीइसी तसेच albendazole गोळीचे प्रत्यक्ष आरोग्य कर्मचारी किंवा आरोग्य स्वयंसेवक याचे समक्ष सेवन करावे असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना देठे यांनी केले आहे.तसेच दोन वर्षाखालील बालके, गरोदर स्त्रिया, तसेच अतिगंभिर आजारी रुग्ण यांनी या गोळ्यांचे सेवन करु नये असेही आवाहन डॉ.अर्चना देठे यांनी केले आहे.
यात 2 ते 5 वर्ष वयोमर्यादा असलेल्यांनी DEC एक गोळी आणि albendazole एक गोळी तसेच 6 ते 14 वर्ष वर्गासाठी DEC दोन गोळ्या आणि albendazole एक गोळी.तसेच 15 वर्षा वरील DEC 3 गोळ्या आणि albendazole एक गोळीचे सेवन करावे.सर्वांना आरोग्य कर्मचारी,आशा वर्कर, अंगणावाडी सेविका यांचे मार्फत गोळ्या घरपोच मिळतील.उपाशीपोटी गोळ्या खाऊ नये.औषध खाण्यास नकार देणाऱ्या व्यक्तीचे मत परिवर्तन करण्यासाठी गावातील इतर प्रतिष्ठित व्यक्तींनी सहकार्य करावे.तसेच सर्वांनी एकच वेळी गोळ्यांचे सेवन केल्यामुळे हत्तीरोग जंतूंचा समूळ नायनाट होऊन आपण आपला तालुका हत्तीरोग मुक्त होण्यासाठी सहकार्य करावे .असेही आवाहन आरोग्य विभागाचे वतीने करण्यात आले आहे
हत्तीरोग हा डासांमुळे होत असल्यामुळे
आपल्या गावातील , घराशेजारील डास उत्पत्ती स्थाने नष्ट करावी.आठवड्यातून एक दिवस घरातील सर्व भांडी रिकामी करून कोरडा दिवस पाळावा.
संडास च्या पाइप ला जाळ्या किंवा कापड बांधावा.घरा भोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा.झोपताना मच्छरदाणी चा वापर करावा .डास पळवून लावणाऱ्या इतर साधनांचा वापर करावा.जेणेकरून आपण डासा पासून होणाऱ्या आजार हत्तीरोग , डेंग्यू , मलेरिया , चिकन गुनिया, मेंदुज्वर
इत्यादी आजारापासून मुक्त राहू.
डॉ. अर्चना देठे
तालुका आरोग्य अधिकारी मारेगांव