• फक्त एका जागेवर परिवर्तन..
माणिक कांबळे/ मारेगाव :- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये कांग्रेस, सेना युतीच्या शेतकरी एकता पॅनलचा दंणदणीत विजय झाला आहे. मात्र आर्थिक दुर्बल घटक मतदार गटात भाजपा समर्थीत शेतकरी परिवर्तन पॅनल च्या एकाच उमेदवाराने मुसंडी मारली आहे.
30 एप्रिल ला 8वाजे पासून 4वाजे पर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली.सायंकाळ 6वाजे पासून मतमोजणी होऊन 8.30वाजता निकाल घोषित करण्यात आला आहे. राजकीय दृष्ट्या अंत्यन्त महत्वाची समजली जाणारी मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणुक निकाल रात्री उशिरा पर्यंत जाहीर करण्यात आला आहे.माजी आमदार वामनराव कासावार विश्वास नांदेकर यांनी शेतकरी एकता पॅनल तर आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी शेतकरी परिवर्तन पॅनल उभे करून ही निवडणुक प्रतिष्ठाची केली होती.
या निवडणूक मैदानात जनहित कल्याण संघटनेचे अध्यक्ष गौरीशंकर खुराणा,माजी जिल्हा परिषद सदस्यां अरुणाताई खंडाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती वसंतराव आसुटकर, डॉ. महेंद्र लोढा यांचे निकटवर्तीय तथा सरोदे समाज संघटना विदर्भ प्रांतचे सचिव अंकुश मापूर, अखिल भारतीय सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट सचीव सुरेश लांडे, तालुका भाजपा अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे ही मोठ्या फळीतील नेते मंडळी आपले भाग्य अजमावत असताना जाहीर करण्यात आलेल्या निकाला मध्ये गौरी शंकर खुराणा ,अरुणा खंडाळकर, वसंतराव आसुटकर,गणू थेरे, यादव काळे, जीवन काळे, काशिनाथ खडसे, ब्रम्हदेव जुनगरी, सुनीता मस्की, संतोष मस्की, प्रफुल विखणकर, महादेव सारवे, देविदास बोबडे, भास्कर धांडे,विजयी झाले असून शेतकरी परिवर्तन पॅनल चे एकमेव सरपंच संघटनेचे अध्यक्ष अविनाश लांबट हे विजयी झाले आहे.


