अजय कंडेवार,वणी : बिहार राज्यातील बोधगया येथील महाबोधी महाविहार याचे व्यवस्थापन हे पूर्णतः बौद्ध बांधवांकडे सोपवण्यात यावे आणि प्रचलित कायद्यात सुधारणा करण्यात यावी,अशी मागणी करणारे निवेदन (4 मार्च ) रोजी वणी येथील बौद्ध बांधव आणि भगिनींनी वणी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत देशाचे राष्ट्रपती यांना पाठविण्यात आलें आहे.
जगातील बौद्ध बांधवांचे पवित्र श्रद्धास्थान असलेले महाबोधी महाविहार हे अत्यंत प्राचीन विहार आहे. त्या ठिकाणी अडीच हजार वर्षांपूर्वी तथागत् भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती. त्यामुळेच येथे हा विहार बांधण्यात आला होता. ब्रिटिश अधिकारी लॉर्ड कॅनिंगहम यांनी या विहाराचा शोध लावला होता. ब्रिटिशांच्या आमदनीत बौद्ध विचारवंत अनागारिक धम्मपाल (श्रीलंका) यांनी महाबोधी महाविहाराला पुनरूज्जीवित केले. या विहाराचे व्यवस्थापन पूर्णतः बौद्ध धर्मीयांच्या हाती येऊ शकलेले नाही. गेल्या दोन-अडिचशे वर्षांपासून त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत; मात्र अद्यापही बौद्धांच्या धार्मिक स्थळावर हिंदू धर्मियांचे बहुमत असणारे व्यवस्थापन कार्यरत आहे. त्याला सबंध बौद्धांचा विरोध आहे. याकरिता गेल्या काही दिवसांपासून बोधगया येथे महाबोधी महाविहाराच्या परिसरात बौद्ध भिक्खूंचे आमरण उपोषण सुरू आहे. याला पाठबळ देण्यासाठी वणी येथील बौद्ध बांधव आणि भगिनींनी यांनी वणी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत देशाचे राष्ट्रपती यांना पाठविले आहे.
यावेळी प्रशांत गाडगे, शिवाजी दुपारे, बंडू गणवीर ,चंद्रकांत उपरे, शिव कुशवाह, राहुल कोहते ,करण मेश्राम, इंद्रपाल वाघ ,सुरज वानखेडे ,नरेंद्र वाळके, दत्तू मते ,संग्राम खोब्रागडे, दीपक खोब्रागडे आदि समाज बांधव उपस्थित होते.