सी.ए.हर्षल डाखरे यांचे दुःखद निधन.
सुरेंद्र इखारे,वणी – येथील.एस. पी. एम. विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य विजय डाखरे यांचे सुपुत्र चि. हर्षल विजय डाखरे यांचे आज बुधवारी 21सप्टेंबर रोजी दुपारी चंद्रपूर येथे अल्पश्या आजाराने दुःखद निधन झाले.
हर्षल केवळ 33 वर्षांचा होता. लहानपणापासून कुशाग्र बुद्धीचा हर्षल व्यवसायाने सी.एस. होता.अतिशय मनमिळाऊ आणि विनम्र असलेल्या हर्षलचे असे अकाली जाणे, सर्वांना चटका लावून जाणारे आहे.हर्षलच्या अकाली जाण्यामुळे डाखरे परिवारावर दुःखाचा मोठा आघात झाला आहे.
त्यांच्या पाठीमागे आईवडील , बहीण व मोठा आप्तपरिवार आहे.