अजय कंडेवार,वणी :- रेजंटा सेंट्रल हॉटेल अँड कन्व्हेशंन सेंटर येथे विदर्भ सन्मान सोहळा काल (दि. ३०) ला पार पडला. या सोहळ्यात विदर्भातील विविध क्षेत्रातील कार्यरत सक्रीय अग्रणींचा ‘ News 18 Lokmat यांचा वतीने मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांना ‘ विदर्भ सन्मान “देऊन गौरविण्यात आले .
विशेषतः रुग्णांना मदत,भूमिपुत्रांना रोजगारांसाठी झटणे , पूरग्रस्तांना मदत,विकास चळवळीतील झुंजार नेता, राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्रात व अन्यायांना न्याय मिळवून देणारे तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांना सामाजिक कार्यासाठी ‘ News 18 Lokmat विदर्भ सन्मान पुरस्काराने ‘ मराठी अभिनेते तथा सामाजिक कार्यकर्ते सयाजी शिंदे यांच्या हस्ते ‘विदर्भ सन्मान ‘पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला.
या सोहळ्यात गडचिरोलीचे पोलीस उपमहानिदेशक संदीप पाटील यांचेसह विविध शासकीय विभागातील मुख्य अधिकारी व प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते.