•छत्रपती शिवाजी महाराज चौकात दिसणार थरार.
•DJ साऊंड सिस्टीम व लाईट्सद्वारे साजरीकरण, फटाक्याची आतिषबाजींचाही समावेश.
अजय कंडेवार,वणी :- महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वणी विधानसभा क्षेत्रातर्फे रविवार दिनांक १९ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ठीक २.०० वाजता आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप अंतिम सामना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकीत पुतळ्यासमोर दाखविण्यात येणार आहे. क्रिकेट प्रेमींसाठी ही पर्वणी ठरणार आहे.
भारत आणि आज होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध साऊथ आफ्रिका यातील विजेता संघ मधील क्रिकेटचा सामना म्हणजे संपूर्ण भारतीय क्रिकेट प्रेमींची उत्सुकता शिगेला पोचविणार आहे. याची दखल घेत मनसेच्या वतीने आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत अंतिम सामना भव्य स्क्रीनवर थेट प्रक्षेपण दाखवण्यात येणार आहे.
विशेष आकर्षण मध्ये L.E.D विडीयो वॉलद्वारे लाइव्ह प्रसारण, DJ साऊंड सिस्टीम व लाईट्सद्वारे साजरीकरण, फटाक्याची आतिषबाजी यांचा समावेश असणार आहे. तरी सर्व क्रिकेप्रेमींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनसेच्या वतीने करण्यात आले आहे.