अजय कंडेवार,Wani:- वणी तालुक्यात शबरी, रमाई व प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत असंख्य घरकुल लाभार्थी आहेत. त्यामध्ये त्यांना पहिला हप्ता अनुदान प्राप्त झाले. परंतु उर्वरित अनुदान प्राप्त न झाल्याने या घरकुलांचे बांधकाम थांबले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना तातडीने अनुदान देण्यात यावे यासाठी मनसेच्या वतीने मनसे नेते राजु उंबरकर यांच्या मार्गदर्शनात वणी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार व घरकुल लाभार्थी यांनी १० सप्टेंबर रोजी पंचायत समितीला निवेदन देत २८ तारीख ही अंतिम दिलेली होती परंतु उर्वरित अनुदान अद्यापही लाभार्थ्यांच्या खात्यात प्राप्त न झाल्याने “फाल्गुन ” ने उपोषणाचे शस्त्र हाती घेत फाल्गुन गोहोकारसह घरकुल लाभार्थी सोमवार ३० सप्टेंबर रोजी वणी तहसिल कार्यालय समोर “बेमुदत आमरण उपोषण” सूरू करणार आहे.
घराचे स्वप्न साकार होणार असल्यामुळे वणी तालुक्यात शबरी, रमाई व प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत असंख्य घरकुल लाभार्थी आहेत.या असंख्य लाभार्थ्यांनी जमा केलेली पुंजी तसेच खासगी सावकारांकडून कर्ज काढून घरासाठी पैसे खर्च केले. या लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याची रक्कम वेळेवर मिळाली; पण दुसऱ्या हप्त्याची रक्कम मिळत नसल्यामुळे घराचे बांधकाम रखडले आहे. या गरीब गरजूंना स्वतःचे पक्के घर बांधून देण्यासाठी रमाई आवास योजनेमार्फत एक लाख २० हजार रुपये आर्थिक साहाय्य करण्यात येते. पहिला हप्ता १५ हजार रुपये मिळाल्याने लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम पूर्ण केले. घरकुलासाठी विटा, सिमेंट, मजुरी उदारी रक्कम काढून लाभार्थ्यांनी खर्च केले. घरकामाचे बांधकाम पूर्ण झाल्यावर नियमाप्रमाणे हप्ता मिळेल या आशेवर घरकुल लाभार्थी उर्वरित हप्त्यापासून वंचित आहेत. परंतु पंचायत समिती प्रशासनाकडून अद्यापही मागणी पुर्ण झाली नसल्याने मनसे अध्यक्ष “फाल्गुन गोहोकार” ने उपोषणाचे शस्त्र हाती घेत घरकुल लाभार्थीसह सोमवार ३० सप्टेंबर रोजी वणी तहसिल कार्यालय समोर “बेमुदत आमरण उपोषण” सूरू करणार आहे.
समस्त वणी तालुक्यातील घरकूल लाभार्थ्यांनी या “बेमुदत आमरण उपोषणाच्या” मंडपात उपस्थित राहून शासनाला आपला अधिकार “मागू या”… आणि जागे “करू या ” या साठी उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी केले आहे.