•मनसे नेते राजूभाऊ उंबरकर हेच माझे आदर्श – फाल्गुन गोहोकार (मनसे तालुका अध्यक्ष,वणी)
अजय कंडेवार,वणी:- ‘माणसाने कितीही उंची गाठली तरी त्याचे पाय जमिनीवर असायला हवेत! ही म्हण मनसेचा “ढाण्या वाघ” समजले जाणारे फाल्गुन गोहोकार यांचात स्पष्ट दिसून येते.समाजाच्या प्रत्येक स्तरातील लोकांच्या सुख दुःखात सहभागी होऊन जमेल तितके त्यांच्या आयुष्यात आनंद पेरत राहावे,’ अश्या सुंदर विचाराचे , अत्यंत साध्या स्वभावाचे व वणी तालुक्यांत समस्त युवकांचे आवडते फाल्गुन गोहोकार आहेत. दिनांक 21 डिसे रोजी वणी शहरातील शेकडो युवकांनी फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवसानिमित्य सामाजिक भावना जोपासत विविध उपक्रमांच्या माध्यमातून आनंदाचे झाड पेरले ! कुठे वृक्षारोपण, कुठे लहान मुलांना खाऊ वाटप, स्वेटर वाटप, कुठे अन्नदान तर अपंग व वृद्धाश्रमात आयोजित करून साधेपणाने सामाजिक भान जपत वाढदिवस साजरा करीत सार्थक केले!
मनसेचा ढाण्या वाघ तालुका वणी चे अध्यक्ष फाल्गुन गोहोकार् यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यासाठी समस्त मनसे सैनिक व मिञपरिवार यांनी पुढाकार घेतला होता. वाढदिवसाचे औचित्य शहरातील अनेक भागात कार्यक्रम पार पडले. यानिमित्त समाजातील गरीब व गरजूसाठी यासारखे उपक्रम राबविण्यात आले.
वृदआश्रमात कपडे वाटप , रुग्णांना फल वाटप तसेच अपंग व वृद्धमाता पित्यांसोबत वाढदिवसानिमित्त करीत अनेकांना वेगवेगळ्या प्रकारचा साहित्याचे वाटपही करण्यात आले.शालेय साहित्य, अनेक लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांना मोठा प्रतिसादही मिळाला.