•ग्रामपंचायत व कनिष्ठ प्राथमिक शाळा यांच्या वतीने.
अजय कंडेवार,वणी:- तालुक्यातील भुरकी ग्रामपंचायत अंतर्गत शासनाच्या आदेशानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने “मेरी माटी,मेरा देश” अभियानांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन दि.27 सप्टें.बुधवार रोजी भूरकी ग्रामपंचायत व कनिष्ठ प्राथमिक शाळा यांच्या वतीने यात्रेची सुरुवात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करीत कलश घेऊन फेरी काढण्यात आली.
भुरकी नागरिक, ग्रामपंचायत कार्यालय,जिल्हा परिषद शाळेतील व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवरांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त “मेरी माटी मेरा देश” या उपक्रमाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. गावातील पवित्र माती व तांदुळ या कलशामध्ये जमा करण्याचे आवाहन केले. यावेळी गावातील नागरिक व विद्यार्थ्यांनी कलशामध्ये माती व चिमूटभर तांदुळ टाकून गावात फेरी काढत “भारत माता की जय”असा जयघोष केला.यावेळी या यात्रेत सीमा हरिश्चंद्र बदकी( सरपंच), विनोद दानव ( उपसरपंच),प्रज्ञा जीवने ( ग्रामसेविका), प्रमोद सोनटक्के,अनिता कुमरे, एकनाथ मेश्राम, वंदना शेंद्रे, ललिता पेचे हे सर्व सदस्य उपस्थित होते. त्याचप्रमाणे जि.प.प्राथमिक शाळेचे अध्यक्ष राम देऊळकर,उपाध्यक्ष हरिश्चंद्र बदकी, प्रकाश तालावार(मुख्याध्यापक),सचिन देऊळकर,दिनेश लोणारे,रंजना लांबट,ज्योती बदकी व स्नेहल गाडगे हे सदस्य म्हणून उपस्थित होते तर कोमल देऊळकर, सुनीता जीवतोडे, जिजाबाई काळे,सुषमा काळे, लता झाडे (अंगणवाडी सेविका) तसेच नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.चौकात पंचप्रण शपथ व स्वच्छतेची शपथ घेतली व लोकांना स्वच्छता अभियान राबविण्याचे देखील सांगितले.