अजय कंडेवार,वणी:- 19 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भुरकी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राम देऊळकर , प्रमुख पाहुणे म्हणून सीमा बदकी (सरपंचा) , विनोद दानव (उपसरपंच) तथा सर्व शाळा व्यवस्थापन समिती हे होते .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा देऊळकर हिने केले व प्रास्ताविक व आभार प्रदर्शन प्रकाश तालावार ( मुख्याध्यापक) यांनी केले.रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी विद्यार्थ्यांनी भाषणे दिली. राज्य गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अध्यक्षिय भाषणानंतर खाऊवाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली नंतर श्री साई उत्सव मंडळ, श्री गुरुदेव सेवा मंडळ, ग्राम पंचायत, भुरकी यांचे संयुक्त विद्यमाने रामधून दिंडी काढण्यात आली, यात संपूर्ण गावकऱ्यांनी सहभाग घेतला, भजने म्हटली. जागोजागी लोकांनी खाऊ, बिस्किटे, चाय व मसालेभात देण्यात आले