•मॅकरून सिटी ब्रांच मध्ये ‘स्वातंत्र्य दिन’ उत्साहात.
विदर्भ न्यूज,वणी:- येथील मॅकरून सिटी ब्रांच सीबीएसई शाळेत दि. 15 ऑगस्ट 2023 रोजी भारताचा 77 वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.सर्वप्रथम संस्थेचे उपसंचालक यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. त्यानंतर लगेचच राष्ट्रगीताला सुरुवात झाली.
स्वातंत्र्य दिनाच्या या पर्वावर शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांनी भरपुर कार्यक्रमाची भरगच्च मेजवानी दिली. यामध्ये नर्सरी ते चौथी वर्गातील चिमुकल्यांनी वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेऊन राष्ट्राप्रती आणि राष्ट्रपुरुषांप्रती आपले प्रेम व्यक्त केले. त्यानंतर माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत आणि नृत्य सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. अनेक विद्यार्थ्यांनी गाण्यावर व चिमुकल्यांचा भाषणातून देशातील एकता समता व बंधुता याचे दर्शन घडवले. विशेषतः हा कार्यक्रम भर पावसात सुरू असतानाही विद्यार्थी व संस्थेचे उपसंचालक जराही सरकले देखील नाही. जवळपास 40 चिमुकल्यांचे भाषणे देखील उपसंचालक पियूष आंबटकर व मुख्यद्यापिका अश्विनी ढोले यांनी शांतरित्या ऐकले हे देखील आकर्षणीय बाब ठरली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे उपसंचालक पियूष आंबटकर, शाळेचे मुख्यद्यापिका अश्विनी ढोले तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समस्त शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्याचप्रमाणे मुलांचे कौशल्य पाहण्यासाठी, त्यांचे कौतुक करण्यासाठी आणि त्यांना प्रेरित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पालकवर्गही या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होता. एकूणच “मॅकरून सिटी ब्रांचचा” स्वातंत्र्य दिनाचा हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.