•पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सामाजिक भान जपत केला वाढदिवस साजरा.
अजय कंडेवार,वणी :- राज्याच्या इतिहासात आजपर्यंत कोणत्याही नेत्याने जे करून नाही दाखवलं ते म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री आणि बाळासाहेबांची शिवसेना गटाचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा काल दिनांक 9 फेब्रुवारीला वाढदिवस होता. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये एकच उत्साह.. पण, शिंदेंनी सामाजिक भान जपत वाढदिवशी समाज उपयोगी काम करा, असा सल्लावजा आदेश देखील दिला होता. त्याचाच एक भाग बाळासाहेबांची शिवसेना वणीच्या वतीने ग्रामीण रुग्णालय वणी येथे रुग्णांना महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटप केले.
यावेळी बाळासाहेबांची शिवसेना यवतमाळ जिल्हा संपर्कप्रमुख विनोद मोहितकर, किशोर नांदेकर तालुकाप्रमुख, वणी तालुका संघटक टिकाराम खाडे, ललित लांजेवार शहर प्रमुख, राजू तुराणकर माजी शहर प्रमुख,विकी चवणे, युवराज ठाकरे, कैलास पखाले, वसंत डुकरे, राहुल उपाटे,, राजू चौधरी, गौरव मांढरे, नितीन पाचरे, अमर शर्मा, सुरेश गिरसावले, सागर वाटेकर,अतुल जूनगरी, शशांक गुडघाणे, मारोती पेद्धीवार, मनोज लांढे, अक्षय गाथाडे व शिवसैनिक उपस्थित होते.