•कायर गावात 20 वर्षापासून परंपरा सूरू.
अजय कंडेवार,वणी:- तालुक्यातील कायर गावात विठ्ठल शंकावार यांचा पुढकाराने मल्लेश अडकीलवार यांचा अंगणातच हा “बतकम्मा “उत्सव मागिल 20 वर्षापासून परंपरा ही अबाधित सूरू आहे . ” बतकम्मा “रंगबिरंगी फुलांवर आधारित हा सण नवरात्रीच्या नऊ दिवसांत भागात मोठ्या जल्लोषात साजरा होतो.
कायर येथे टिपलेले क्षण …..
बतकम्मा…. रंगबिरंगी फुलांवर आधारित हा सण. नवरात्रीच्या नऊ दिवसांत वणी तालुक्यांतील कायर या गावात मागिल 20 वर्षापासून साजरा होतो. इथे तेलुगू भाषिकांची संख्या मोठी असल्याने इथेही त्याची झलक दिसून आली. तर विशेष म्हणजे नवरात्री उत्सवात ‘बतकम्मा बतकम्मा उयालो’ म्हणत महिलांचा खेळ शक्तीप्रदर्शनच प्रयत्न मोठ्या प्रमाणात असतो.
विविध रंगांच्या फुलांनी तयार केलेल्या बतकम्माला गौरीचे प्रतिरुप मानले जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून महिला रंगबिरंगी फुलांनी बतकम्मा तयार करतात. फुलांचा थर त्यासाठी तयार केला जातो. रोज सायंकाळी मल्लेश अडकिलवार यांचाच अंगणात गावातील तेलगू महिला एकत्र येत बतकम्मा खेळतात. ‘बतकम्मा बतकम्मा उय्यालो’ हे गाणे गात फेर धरतात. सध्या तेलुगुतील प्रसिद्ध लोकगीतकारांच्या आवाजात शब्दबद्ध केलेली गाणी तयार करण्यात आल्याने पारंपरिक गीतासोबत या नवीन संगीतावर तयार केलेल्या गाण्यांवरही महिला बतकम्मा खेळतात.
नवरात्रीदरम्यान हा सण