Tuesday, February 17, 2026
HomeBreaking Newsबघा....तहसिलदार साहेब...शिरपूर ठाणेदाराची वक्रदृष्टी रेती तस्करांवर पडली ....

बघा….तहसिलदार साहेब…शिरपूर ठाणेदाराची वक्रदृष्टी रेती तस्करांवर पडली ….

वरिष्ठांचा कुठलाही धाक एसडीओंसह तहसीलदारांवर उरलेला नाही. • महसूल प्रशासनाच्या 'लेच्यापेच्या' अर्थात कमकुवत भूमिका. • शिरपूर पोलिसांची जबरदस्त कारवाई.

Ajay Kandewar,Wani:- येथील महसूल अधिकारी व कर्मचार्‍यांच्या नाकावर टिच्चून रेती तस्करी बिनबोभाट सुरु असुन तालुक्यात महसुल विभागाच्या नाकावर टिचून रेतीची चोरी बिनबोभाटपणे सुरु आहे. रेती चोरीमुळे शासनाचा महसुल बुडत आहे .वाळू तस्करीने कळस गाठला असल्याचे निदर्शनात येत आहे. या प्रकारात अनेक दिवसापासुन बेसुमार वाढ झाली असून, रात्री बेरात्री बिनबोभाटपणे नव नवीन शक्कल लढवून अवैध रेतीची तस्करी केल्या जात आहे. गावामध्ये दलालामार्फत अव्वाच्या सव्वा दराने वाळू विक्री करुन रेती माफीया गब्बर झाले आहेत. वणी येथील महसुल विभाग मुग गिळुन चुपचाप आहे. आता तर महसूल प्रशासनातील काहीं “खादाडवृत्तीचा” अधिकाऱ्यांचा तसेच महसूल’ लेच्यापेच्या’ अर्थात कमकुवत भूमिकेमुळे दहाही दिशांमध्ये फोफावली आहे. त्यातच शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चक्क मोठ्या ट्रकनेच रेतीची चोरटी वाहतूक सुरू आहे.गुन्हेगारी वर्तुळावर बारीक लक्ष ठेऊन असलेल्या शिरपूर ठाणेदार माधव शिंदे यांनी तस्करांचा डाव हाणून पाडला आहे.शिरपूर पोलिसांनी रेती तस्करांवर जबरदस्त वक्रदृष्टी फिरवित तब्बल ५१ लाख ९२ हजारांचा मुद्देमाल जप्त करीत महसूल विभागाचा कार्यप्रणाली वर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

शिरपूर पोलिसांच्या हद्दीतून वाहणाऱ्या नद्यांच्या पात्रात रेती तस्करांची जत्रा आहे. प्रामुख्याने महसूलच्या यंत्रणेत “हप्ता संस्कृतीचा” धुमाकूळ सुरू आहे. जिल्हा प्रशासनातील वरिष्ठांचा कुठलाही धाक एसडीओंसह तहसीलदारांवर उरलेला नाही. माध्यमातून वास्तव पुढे आल्यानंतरही महसूलची यंत्रणा कुठलीही कारवाई करीत नाही. त्यामुळे गौण खनिज तस्करीचा गोरखधंदा अख्या वणी तालुक्यातच वाढला आहे.पोलिसांना रेती तस्करी दिसत असताना महसूल यंत्रणेला का दिसत नाही, हा सवाल आता सामान्य जनता करीत आहे.

MH २९ BE ६२९६ व MH २९ BE ६२९७ या दोन वेगवेगळ्या क्रमांकाच्या ट्रकमध्ये प्रत्येकी १२ ब्रास वाप्रमाणे २४ ब्रास रेती अवैधरित्या चोरून नेली जात होती. दरम्यान, आरोपीतांच्या ताब्यातून ५० लाखांचे ट्रक व एक लाख ९२ हजार किमतीची २४ ब्रास रेती जाम केली आहे. सय्यद शहाबुद्दीन सय्यद अफसर (३३) रा. पुसद खादी बार्ड, शेख हसन इमाम शेख उबेटूर रझाक (५१) अशी दोन ट्रकचालकांची तर उमर फारूक (४५) रा. पुसद अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहे. याप्रकरणी शिरपूर पोलिसांनी आरोपी वाहन चालकांसह अन्य एक अशा तिघांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (३), ३(५) व सहकलम १५ पर्यावरण संरक्षण अधिनियम तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम ४८ (७) अन्वये गुन्हे दाखल केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments