Ajay Kandewar,Wani:- मेटॅलिफेरस समिती नागपुर विभागाकडून सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान त्या ठिकाणी विविध मान्यवरांच्या हस्ते अनेक खान क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान सुद्धा करण्यात आला. दरम्यान वांजरी चुनखडी आणि डोलामाईट, खान सह उत्कृष्ठ पुरस्काराने सन्मानित झाली असुन नागपुर विभागाकडुन फैजल व सुमेर खान यांनी हा सन्मान दि 30 ला मुकुटबन येथे झालेल्या कार्यक्रमात स्विकारला आहे
वणी उपविभागात मोठ्या प्रमाणात असलेल्या विविध खाण सुरक्षा संदर्भातील महत्व व विविध सुरक्षेबाबत याप्रसंगी मार्गदर्शन करण्यात आले. 42 व्या मेटलिफेरस माइन्स सेफ्टी वीक सेलिब्रेशन 2024 मध्ये गट ब एकूण श्रेणी – प्रथम पारितोषिक, खाणी योजना आणि रेकॉर्ड – प्रथम पारितोषिक, प्रथम पारितोषिक, साठवण, वाहतूक आणि वापर – द्वितीय पारितोषिक, व्यवसायिक आरोग्य, सुरक्षा आणि कल्याण सुविधा – द्वितीय पारितोषिक तर व्यावसायिक प्रशिक्षण आणि प्रथमोपचार- तृतीय पारितोषिक, एकूणच अश्या सहा उत्कृष्ठ पारितोषिक यांना प्राप्त झाले आहे.हा सन्मान फैझल बशीर खान व सुमेर बशीर खान यांनी स्विकारले दरम्यान त्यांच्यावर आनंदाचा वर्षाव होत आहे.