अजय कंडेवार,Wani:- तालुक्यातील राजूर गावामध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य व साथीच्या आजाराचे थैमान सुरू असतानाच ग्रामपंचायतच्या वतीने हवेत असणाऱ्याच डासांकरीता फक्त धूर फवारणी करण्यात आली माञ धूर फवारणीने पाण्यातील डास नष्ट होणार नाहीं तर साठलेल्या पाण्यात,गटारीत जंतूनाशक फवारणी करण्याची आवश्यकता असल्याची जाणीव युवासेनेच्या वतीने राजूर येथील ग्रामपंचायत सरपंच/सचिव यांना करून देत उपाययोजना करण्याकरीता लेखी निवेदन देण्यात आले.
एक महिन्याआधी गावात धूर फवारणी करण्यात आली. परंतु फोगिंग मशीनने उलट वायू प्रदुषण होतोय असा स्पष्ट आरोप निवेदनातून करण्यात आला.परिसरातील अनेक दुकाने आहे त्या दुकानासमोर मोठं मोठें तळ स्वरूपाचे पाण्याचे डबके साचले आहे.या पाण्याचा डबक्याचा ठिकाणी सदृश डासांची उत्पत्ती होत आहे. तरीही या ठिकाणी औषध फवारणी ऐवजी धूर फवारणी करून मस्त मौलासारखे सुस्त ग्रामप्रशासन दिसून येत आहे.डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांना सदृश आजार उद्भवण्याची दाट शक्यता आहे. यावर उपाययोजना करण्याऐवजी सुस्त प्रशासन नेमके काय काम करतात, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला. त्याकरिता तसेच डेंगू, मलेरिया व साथीच्या रोगावर अंकुश आणण्यासाठी फक्त धूर फवारणी न करता त्या साठलेल्या पाण्यात व नाल्यामध्ये टी.सी.एल पावडर टाकुन, जंतुनाशक फवारणी करण्यात यावी व आशा वर्कर्स यांना उपाययोजनात्मक कार्य करण्यास आदेश द्यावे.जेणेकरून गावात वाढणाऱ्या साथीचा रोगांवर नियंत्रण करता येईल याकरीता ग्रामपंचायत प्रशासनाला युवासेेनेने चार्ज करण्याचा माध्यमातुन निवेदन देत मागणी केली आहे.
निवेदन देताना अमृत फुलझेले ,अभिजित सुरशे, शिनू दासारी, प्रफुल पाटील,मोंटू पामुलवार, अजित,आकाश बोलगलवार, आकाश जोगदंडे , बादल वाडके आदि उपस्थित होते.