▪️ आरोग्य सेवेपासून नागरिक वंचित
▪️ तालुक्यातील आरोग्य यंत्रणा संपूर्णपणे कोलमडली
देव येवले, (विशेष सहसंपादक,झरी) : पाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची नवी इमारत ही संपूर्णपणे बांधून तयार आहे. परंतु थातुरमातुर कारणे समोर ठेवून संबंधित आणि जबाबदार अधिकारी व लोकनेत्यांच्या दुर्लक्षितपणामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याला मुहूर्त सापडत नसल्याने या भागातील रुग्णांवर औषध उपचारासाठी खाजगी दवाखाने करावे लागत आहे.
तालुक्यात तीन प्राथमिक आरोग्य केंद्रे, व एक ग्रामीण रुग्णालय आहे. रुग्णालयातील सोयींचा अभावामुळे, व अपुऱ्या कर्मचाऱ्यामुळे तालुक्यातील आरोग्य यंत्रणा संपूर्णपणे कोलमडली आहे. झरी, पाटण भागातील रुग्णांची संख्या जास्त असून लहान मोठ्या सर्व स्तरातील रुग्णांचा समावेश आहे. मात्र अपुऱ्या सोई सुविधेमुळे तालुक्यातील नागरिकांना वणी, पांढरकवडा, आदिलाबाद व यवतमाळ सारख्या सोईच्या व खाजगी रुग्णाल्यात उपचार घ्यावा लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.करोडो रुपये खर्च करून प्राथमिक केंद्राची भव्य इमारत उभी करण्यात आली. त्यात अधिकारी व कर्मचाऱ्याकरिता 13 निवासी सदनाचाही समावेश आहे. गेल्या तीन वर्षांपासून ही इमारत लोकार्पणाची वाट पाहत आहे. लोकप्रतिनिधी, जिल्हा व तालुका आरोग्य अधिकारी यांना या लोकार्पणाच्या बाबीकडे हेतू पुरस्पर दुर्लक्ष करित असल्याचा आरोप स्थानिक नागरिकातून होत आहे.