•तीनही तरुणांचे मृतदेह सापडले…
अजय कंडेवार,वणी :- शहरातील तीन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दि.2 सप्टे. ला सायंकाळी 5 वाजताचा सुमारास घडली. परंतू रविवार दि.3 सप्टें सकाळीं तरुणांचा शोध घेत पाण्यातून मृतदेहच बाहेर काढण्यात आल्याने या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
वणी शहरातील तीन युवक काल दि.2.सप्टे.ला बेपत्ता असल्याने दिवसभर चर्चा सुरू होती . त्यांचा बद्दल माहीती घेत असता शेवटीं सायंकाळ झाली परंतू थांगपत्ता कुठेच लागत नव्हता.तेवढ्याच वांजरी गावालगत असलेल्या डोलोमाईट खाणीच्या खड्ड्यालगत तीन तरूणांचे कपडे, चपला, स्कूटी व मोबाईल आदी साहित्य आढळून आल्याची बातमी वाऱ्यावर सारखी पसरली असता हेच तरूण खड्ड्यातील पाण्यात बुडाले तर नाही ?अशी शंका व्यक्त केली.दरम्यान, शनिवारी सायंकाळी या घटनेची माहिती मिळताच वणी पोलिस ठाणेदार चमूसहीत घटनास्थळी दाखल झाले. हे तीन तरूण वणीतील असल्याचे सांगितले जात होते.अंधार झाल्याने रविवारी सकाळीच NDRF पथक येऊन शोधकार्य सुरू केले जाईल असेही पोलिसांकडून सांगण्यात आले होते.
शेवटी NDRF चमू सकाळीं दि.3 सप्टें रविवार दाखल झाली. शोधकार्य जोमात सुरू केले. सकाळीं 8 वाजताच तीनही तरुणांचा मृतदेहच हाती सापडले. यात हे तीनही तरुण आसिफ शेख (वय 16) ,नुमान शेख(वय 15 वर्ष)हे दोन युवक एकता नगर येथील तर प्रतीक संजय मडावी (वय 16) अशी मयताची नावे आहेत.हे तीनही तरुण नेहमी पोहण्यासाठी शहरानजीक असलेल्या वांजरी(खदान) येथे यायचे असे तेथील लोकांनी माहीती दिली होती. परंतू नेमका मृत्यु कश्याने झाला याबाबत अधिक माहिती शवविच्छेदनानंतरच समोर येईलच. त्याकरिता या मयत तीनही तरुणांचा मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आलें आहे. पुढील तपास वणी पोलीस जमादार प्रभाकर कांबळे व अमोल नुनेलवार करीत आहे.