•”वीर जवान अमर रहे” या घोषणेद्वारे वीर शहीद जवानांना मानवंदना.
•युवासेना मिञपरिवार यांच्या वतीने कार्यक्रम.
अजय कंडेवार,वणी:- १४ फेब्रुवारी २०१९ हा दिवस समस्त भारतवासी करीता काळा दिवस होता. याच दिवशी काश्मीर मधील पुलवामा येथे आपले कर्तव्य बजावून परत येणाऱ्या भारतीय CRPF च्या ताफ्यावर अचानक दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. यात ४० वीर जवान शहिद झालेत. त्या वीर अमर जवानांच्या स्मृतीस श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता वणी येथील युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे व यांच्या नेतृत्वात युवासेना मिञपरिवार यांनी (ता .१४ फेब्रु) रोजी सायं. ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पूर्णांकित पुतळ्यासमोर येथे श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी अमर जवानाची प्रतिकृती समोर असंख्य मेणबत्ती प्रज्वलीत करण्यात आल्या. शहीद वीर जवानांना २ मिनिट मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. “वीर जवान अमर रहे” व “भारत माता की जय” या घोषणेद्वारे वीर शहीद जवानांना मानवंदना देण्यात आली.
या श्रद्धांजली कार्यक्रमाला युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे,चेतन उलमाले, कैलास मेश्राम, परशुराम पोटे,राहुल कोलते, गणेश सर असुटकर, संतोष मगीडवार, पियूष नांदेकर, प्रतीक काकडे, अगम खत्री, अभिजित चालखुरे,शहरवासी, बहुसंख्य युवक बालक उपस्थित होते.