•पोलीस प्रशासन “त्या”खंडणीखोरांवर गून्हा कधी दाखल करणार याकडे लक्ष.
•अन्यथा जिल्हयातील सर्व डॉ.संघटना तीव्र आंदोलनाचा पावित्र्यात.
“त्या दोघांवर” गुन्हा दाखल करा व मुख्य सुत्रधार शोधा अशी मागणी.
अजय कंडेवार,वणी:- नवजात बाळ प्रकरणी चौकशी समिती व न्यायप्रविष्ट असतांनाही सतत डॉ.महेंद्र लोढा यांना “या” प्रकरणातील काहीजण सतत पैश्याची मागणी करून मानसिक त्रास देत असल्याचा पुराव्यासहित डॉ. महेंद्र लोढा यांनी थेट पोलिस स्टेशन गाठत “त्या ” खंडणीखोर व प्रकरणामागिल सूत्रधारालाही शोधून गून्हे दाखल करून योग्य ती कारवाई करण्याकरीता (दि.4 सप्टें) सोमवार रोजी वणी ठाणेदार अजित जाधव यांना निवेदन दिले. जर असे न झाल्यास यवतमाळ जिल्हयातील सर्व डॉ.संघटना तीव्र आंदोलनाचा पावित्र्यात आहे असे स्पष्ट स्वरुपाची माहितीही देण्यात आली.
28 जुलै रोजी त्यांची वणीच्या ग्रामीण रुग्णालयात प्रसूती झाली. मात्र प्रसूती झालेल्या बाळाचे काही अवयव अविकसित होते. डॉ. लोढा यांनी सोनोग्राफी केल्यानंतर बाळाच्या वाढीबाबत माहिती दिली नाही. त्यामुळे अवयव विकसीत न झालेले बाळ जन्माला आले, असा आरोप पालकानी केला होता. परंतु त्यामागील सर्व अभ्यासपूरावे डॉ. लोढा यांनी एका चौकशी समिती व वरिष्ठांना पाठविले. तरीही “ते खंडणी खोर “इथेही न थांबता पैसे देण्याचा धमक्याही देत होते. शेवटी” त्या “नवजात बाळाला सतत उघड्या अवस्थेत कोणतीही विशेष औषधउपचार न करता अनेक जिल्ह्यात फिरवीत असता त्याला संसर्ग झाला.
शेवटी गुरुवारी दिनांक 30 ऑगस्ट रोजी नवजात बाळाचा मृत्यू झाला त्याचेही खापर ” त्या खंडणी खोरांनी” डॉ.लोढा याचावरच फोडले.एव्हढेच थांबले नाही तर बाळाचा पोस्टमॉर्टम नंतर बाळाला लोढा हॉस्पिटलसमोरच मृतदेह आणून ठेवले व तिथेही गोंधळ घातला. तिथेही डॉ.लोढा वर आरोप थांबले नाही.शेवटी “त्या” काही खंडणी खोंरांनी उपोषणाचा पायंडा वापरला असा घणाघाती आरोप डॉ. लोढा यांनी एका पत्रकात सांगीतले.
अश्या या सर्व प्रकरात काहीजण सतत पैश्याची मागणी करून मानसिक त्रास देत असल्याचा पेन ड्राईव्ह मध्ये कॉल रजिस्टर पुरावे व ऑडिओ क्लिप्ससहित डॉ. महेंद्र लोढा यांनी थेट पोलिस स्टेशन गाठत “त्या ” खंडणीखोर व प्रकरणामागिल सूत्रधारालाही शोधून गून्हे दाखल करून योग्य ती कारवाई करण्यात यावी याकरिता निवेदनही दिले .जर रितसर गुन्हे दाखल न झाल्यास यवतमाळ जिल्हयातील सर्व डॉ.संघटना तीव्र आंदोलनाचा पावित्र्यात आहे असे स्पष्ट डॉ.महेन्द्र लोढा यांनी माहिती दिली.