•आमदार व खासदार नसतांनाही ‘जनसेवेसाठी सदैव तत्पर’ नेते राजू उंबरकरांची विशेष ओळख.
अजय कंडेवार,वणी :- उन्हाळ्याच्या काळात दरवर्षी वणी शहरातील नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागतात. त्यामुळे मनसेच्या वतीने जनतेसाठी २४ तास टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. पण मात्र पावसाळ्यानंतर देखील शहरात पाणी टंचाईची भीषण समस्या उद्भवली आहे. निवडणुका नसल्याने लोकप्रतिनिधी नाही. प्रशासक असल्याने जनतेला वाली नाही त्यामुळे आपल्या समस्या मांडणार तरी कोणाकडे? असा प्रश्न जनतेला पडतोय. शहरातील वरोरा रोड वरील विद्या नगरी भागात गेल्या २ – ३ दिवसापासून नळाद्वारे पाणीपुरवठा बंद असल्याने याठिकाणी पाण्याची समस्या उद्भवली होती. यावर मात करण्यासाठी मनसेने टँकर द्वारे पाणीपुरवठा सुरू केला.
नगरपालिका प्रशासनाची शहरात तहान भागविण्यास उपाययोजना तोकडी पडली आहे. वणी शहरात काही भागात गेले ४-५ दिवसांपासून पाणी पुरवठा बंद होता. प्रशासन कोणत्याही प्रकारे स्वतःची जबाबदारी स्वीकारत नसून जाणीवपूर्वक पाणी पुरवठा समस्येकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे विद्या नगरी व परिसरातील महिला भगिनींनी मनसेचे नेते राजू उंबरकर यांच्याकडे धाव घेतली. सतत भेडसावत असलेल्या पाणी समस्येबाबत तक्रार केली व स्थानिक प्रशासना विरूद्ध नाराजी व्यक्त केली. माता भगिनींची ही अडचण लक्षात घेता उंबरकर यांनी आपल्या सहकाऱ्यांना सूचना करत त्वरित टँकर उपलब्ध करून दिला व या माता भगिनीच्या दारात पाणी पुरवठा करणारा टँकर उभा केला. आज रात्री उशिरा पर्यंत हा टँकर चालु असुन शेकडो कुटुंबीयांना पाण्याचा वाटप मनसे सैनिकांकडून होत आहे.
मनसेने टँकरने पाणीपुरवठा सुरू केला. त्यामुळे पाणीटंचाईची दाहकता कमी झाली. मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वणीकरांची तहान भागविली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी उंबरकर यांचे आभार मानले. वणी शहरातील नागरिकांना पुन्हा एकदा मनसेचे वॉटरमॅन अनुभवयास मिळाले. नागरिकांनी मनसेचे उंबरकर यांच्याकडे तक्रार केल्यावर आपले काम नक्की होईल असा विश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे आपल्या हक्काचा आणि कार्यतत्पर म्हणून आता उंबरकर यांची ओळख निर्माण झाली आहे.