•शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल.
वणी : प्रसार माध्यम क्षेत्रातील एका मोठ्या व प्रतिष्ठित खासगी समूहाद्वारा शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक पांडूरंग सोमाजी आंबटकर व उपसंचालक पियूष आंबटकर यांना शैक्षणीक क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट इंटरनॅशनल अवॉर्ड देण्यात आला आहे. प्रथमत:च आयोजित करण्यात आलेला सदर कार्यक्रम दिनांक २८ मे ला दुबई येथील ग्रँड हयात हॉटेल मधे पार पडला.
पी. एस. आंबटकर हे महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ या पूर्व विदर्भातील एकमेव सर्वात मोठ्या संस्थेचे संचालक आहे.त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक शैक्षणिक प्रयोग करून संस्थेला यशस्वीरीत्या पुढे आणले आहे व संस्थेचा कारभार चोख सांभाळला आहे. सोबतच शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रात ते सदैव अग्रस्थानी राहिले.तसेच यावेळी अंकिता पियुष आंबटकर,प्रीती पी.आंबटकर व पायल आंबटकर सोबत होते.
सदर कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे वन आणि सांस्कृतिक कार्य, मंत्री सुधीर मुनगंटीवार,लोकमत मीडिया ग्रुपचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा,अब्दुल रहमान फलकनाझ,निकर्डा ग्रुप (दुबई) चे अध्यक्ष पारस शहाददपुरी, डेन्यूडा ग्रुप ( दुबई ) अध्यक्ष रिझवान साजन,अल आदिल ग्रुप अध्यक्ष धनंजय दातार ,अभिनेत्री नुसरत भारूचा ,हाजी अफ़रत शेख ,मूल्फ इंटरनॅशनल चे अध्यक्ष शाजी उल मूल्फ ,व्हेचर ( दुबई ) व्यवस्थापकीय संचालक निलेश भटनागर,सिरोया ज्वेलर्स,यरीस ग्रुप ( दुबई )चे अध्यक्ष सोहं रॉय, अभिनेत्री स्वप्नील जोशी, अभिनेत्री पार्थना बेहेरे आदी माननीय ग्रुप उपस्थित होते.
पी. एस.आंबटकर सरांनी चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्यातील विध्यार्थाना दर्जेदार आणि मूल्यवर्धित शिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या करियरसाठी नवी दारे उघडली आहेत, महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यातील चंद्रपूर जिल्ह्यात विध्यार्थाना काळासोबत धावणारे दर्जेदार शिक्षण उपलब्ध व्हावे या उदात्त हेतूने १९९५ मध्ये ग्रुप ची स्थापना केली, संस्थापक पी. एस.आंबटकर म्हणतात माझे जीवन आहे तोपर्यंत शिक्षण क्षेत्रामध्ये सेवा समर्पित करीत राहील “सेवा हीच परमधर्म” आहे, यांनी नव्या युगात नवीन पिढी नुसार शैक्षणिक बदल होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले आहे. सोबतच शैक्षणिक क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रात ते सदैव अग्रस्थानी राहिले. तसेच आधुनिक जगात टिकाव धरू शकणारे तंत्रशिक्षण व व्यवसायिक शिक्षण घेऊन आपल्यासह इतरांसाठी रोजगारांची निर्मिती उपलबद्ध करा,तसेच सामाजिक कार्यामध्ये कोविड १९ च्या महामारीच्या वेळी गरजू लोकांना अन्नदान केले, त्यांचे जीवन हे गरजुंना समर्पित आहे त्यांची सेवा करण्याची भावना ही कधीच संपणार नाही.त्यांच्या याच कार्याची दखल घेवून त्यांना सदर आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त झालेला आहे.
या पुरस्काराकरीता त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.