अजय कंडेवार,Wani – राज्य शासनाने २५ जुलै रोजी जाहीर केलेल्या ५० टक्के अधिछात्रवृतीच्या निर्णयाविरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे कार्यालयासमोर वणी तालुक्यातील राजूर येथील पल्लवी गायकवाड व नांदेड येथील हर्षवर्धन दवणे यांच्या नेतृत्त्वात ५ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट पर्यंत संशोधक विद्यार्थ्यांचे “बेमुदत आमरण उपोषण” सुरु करण्यात आले होते आणि त्यावर शासनाने दखल घेत बार्टीच्या ७६३ पात्र विद्यार्थ्यांना १०० टक्के अधिछात्रवृत्ती देण्याचा निर्णय २३ ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. याबाबत राजूर येथील महिलांनी “संघर्ष कन्या” पल्लवी गायकवाड हिच्या सत्कार करण्यात आले.Salute to “that struggle” done by “Pallavi”.
५० टक्के अधिछात्रवृतीच्या निर्णयाविरोधात पुणे येथील बार्टी कार्यालयासमोर पल्लवी गायकवाड(जगदीश दारुंडे यांची पत्नी) व नांदेड येथील हर्षवर्धन दवणे यांच्या नेतृत्त्वात शेकडो संशोधक विद्यार्थ्यांनी बहिष्काराची हाक देत “बेमुदत आमरण उपोषणाचे शस्त्र उगारले व त्याची सुरुवात ५ ऑगस्ट रोजी सूरू केलें. विद्यार्थ्यांचे हे उपोषण सूरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणकर्त्यांशी फोनद्वारे १३ ऑगस्ट रोजी संभाषण केले व बार्टीचा शिष्टमंडळाला बैठकीसाठी निमंत्रण दिले.परंतु जोपर्यंत निर्णायक बैठकीचे पत्र लिखीत स्वरूपात येणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी विद्यार्थ्यांनी भूमिके घेतली आणि शेवटीं हे उपोषण १६ ऑगस्ट पर्यंत चाललें. २३ ऑगस्ट रोजी उपोषणकर्त्यांशी मुख्यमंत्री यांनी बैठक घेत समाधानकारक चर्चा करून आश्वासन दिले. व २५ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या अनुषंगाने सारथी आणि महाज्योती प्रमाणेच या विद्यार्थ्यांची कागदपत्रांची पडताळणी करून व शपथपत्र घेऊन पात्र विद्यार्थ्यांना १०० टक्के अधिछात्रवृत्ती देण्यात येईल. यासाठी एकूण सुमारे ३७ कोटी खर्चास मान्यता देण्यात आली.बार्टीच्या ७६३ पात्र विद्यार्थ्यांना १०० टक्के अधिछात्रवृत्ती देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.याकरीता राजूर गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला व पल्लवी गायकवाड (जगदीश दारुंडे यांची पत्नी) गावातील सूनेने “एक यशस्वी संघर्ष “करून येताच गावातील महिलांनी त्या संघर्ष कन्येचा जंगी सत्कार केला.
यावेळी सुनीता कुंभारे, नीता निमसटकर, सविता येलादे, मंजुषा सिडाम, ममता वेले, आम्रपाली खोब्रागडे, मंगला काळे, नैना सोनटक्के, भाविका सुरंगे, सुवर्णा वानखेडे, लक्ष्मी दारुंडे, स्वाती पेटकर आदि महिला उपस्थित होत्या.